गोविंदाने दिले चौघांना जीवदान, कासा येथील गरीब कुटुंबातील आदिवासी तरु णाचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:09 AM2017-08-28T05:09:41+5:302017-08-28T05:09:49+5:30

डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड झालेला गोविंदा कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने त्याचे ‘हृदय मूत्रपिंड, लिव्हरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे.

 Govind gave the four children the ideal of Adivasi youth of Jiva, poor families of Kasa | गोविंदाने दिले चौघांना जीवदान, कासा येथील गरीब कुटुंबातील आदिवासी तरु णाचा आदर्श

गोविंदाने दिले चौघांना जीवदान, कासा येथील गरीब कुटुंबातील आदिवासी तरु णाचा आदर्श

Next

शशिकांत ठाकूर 
कासा : डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड झालेला गोविंदा कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने त्याचे ‘हृदय मूत्रपिंड, लिव्हरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे.
१५ आॅगस्टला दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर बांधलेला दोर सोडण्याकरिता कैलास झाडावर चढला आणि दुर्दैवाने तो खाली कोसळला याच वेळी त्याच्या डोक्याला जोराचा मार लागून तो जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ जवळील कासा उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सिल्व्हासा येथील विनोबा भावे रु ग्णालयात दाखल केले तेथून त्याला पुढील उच्च उपचाराकरिता वलसाड सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिथे त्याचे सिटी स्कॅन केल्यावर ब्रेन हॅमरेज झाल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांनी १६ आॅगस्टला त्याच्यावर पुढे ३.३० वाजता सुरत मधील नवी हॉस्पिटलमध्ये डॉ. निमेश वर्मा याच्या देखरेखीखाली उपचार सुरु केले. त्यानंतर १९ ओगस्ट ला न्यूरोसर्जन डॉ. मेहुल मोदी आणि न्युरोफिजीशियन डॉ. परेश झान्जमेरा यांनी कैलासला ब्रेन डेड घोषित केले.
कैलासचे वडील जयराम गंग्या घाटाळ व कुटुंबियांनी या विधायक बाबीला संमती दिल्यावर डोनेट लाईफ च्या निलेश मंडेलवाला यांनी इन्स्टीट्यूट आॅफ किडनी डीसीसेस आणि रिसर्च सेंटर अहमदाबाद येथील डॉक्टरांशी किडनी आणि लिव्हर डोनेशनसाठी संपर्क केला आणि हृदयासाठी सिम्स हॉस्पिटल आणि स्टर्लिंग हॉस्पिटलशी संपर्क साधला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नंतर रजिन आॅर्गन आणि टीश्श्यूज ट्रान्सप्लँट आॅर्गनायझेशनच्या डॉ. सुजाता पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी १ङ्म३३ङ्म ची वेटिंग मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये होती. त्यानुसार याकामी कार्यरत असलेल्या टीमने सुरतमध्ये जाऊन त्याचे हृदय स्वीकारले तर किडनी आणि लिव्हर ्र‘१िू अहमदाबादच्या डॉ.बिपीन पॉल यांच्या टीमने स्वीकारले व कैलासचे पार्थिवही चौघांना संजीवनी देणारे ठरले.

Web Title:  Govind gave the four children the ideal of Adivasi youth of Jiva, poor families of Kasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.