पालघर जिल्ह्यात गोविंदा, गोपिकांचा थरथराट; १३०५ दहीहंड्या फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:37 PM2018-09-03T23:37:59+5:302018-09-03T23:38:09+5:30
मच गया शोर सारी नगरी रे...आया बीरज का बाका संभाल तेरी नगरी रे...असं म्हणत आज वसई-विरारमध्ये दहीहंडीचा थरार रंगला साधारण वर्षभरापूर्वी न्यायव्यवस्थेच्या चौकटीतून दहहीहंडीला किती थर लावायचे यावरील निर्बंध हटवण्यात आल्याने मागील वर्षीपासून या सणाची रंगत पुन्हा जल्लोषात साजरी झाली
पारोळ : मच गया शोर सारी नगरी रे...आया बीरज का बाका संभाल तेरी नगरी रे...असं म्हणत आज वसई-विरारमध्ये दहीहंडीचा थरार रंगला साधारण वर्षभरापूर्वी न्यायव्यवस्थेच्या चौकटीतून दहहीहंडीला किती थर लावायचे यावरील निर्बंध हटवण्यात आल्याने मागील वर्षीपासून या सणाची रंगत पुन्हा जल्लोषात साजरी झाली, यंदा वसई तालुक्यात खाजगी व सार्वजनिक अशा एकूण १३०५ दहीहंड्या फुटल्या सकाळ पासूनच या हंड्या कोण-कोण फोडणार हा सवाल मनात घेऊन स्थानिकांच्या नजरा निरनिराळ्या गोविंदा पथकांकडे लागल्या होत्या.
यंदा तर वसई-विरारमध्ये लाखालाखांची पारितोषिके असलेल्या ९ दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मोठी गर्दी केल्याने थरांचा थरार अनुभवण्याची नागरिकांना यंदा चांगली संधी मिळाली. वसई-विरार शहर महानगरपालिकेने यंदा गोविंदांसाठी खास विमा संरक्षण लागू केले होते ही जमेची बाजू होती. त्यासाठी विविध पथकांनी गोविंदांची नावे वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केली होती.
यंदा वसई, विरार आणि नालासोपारामध्ये १ हजार ३०५ दहीहंड्यांसाठी थर लावले लावण्यात आले. यात विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक २४ तर खाजगी ७८० दहीहंड्यांचा समावेश होता. तालुक्यातील इतर पोलीस ठाण्यांतदेखील सार्वजनिक व खाजगी दहीहंड्या फोडण्यात आल्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक १४, तर खाजगी १३, वसई पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ८ तर खाजगी ५५, माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक १९ तर खाजगी ५५, वालीव पोलीस हद्दीत सार्वजनिक १७ तर खाजगी ५९, तुळींज पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक २५, तर खाजगी ८० तसेच नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक २५ तर खाजगी ८० दहीहंड्यांसाठी गोविंदा पथकांच्या थरांचे थरार अनुभवता या परिसरातील नागरिकांना आला.
तलासरीत गोपाळकाला उत्साहात
तलासरी शहरातील वनवासी कल्याण आश्रम, शासकीय मुलांचे गोविंदा पथक तसेच मुलींच्या गोविंदा पथकाने दहीहंड्या फोडल्या. ते पहायला े आदिवासी बांधव उपस्थित होते. आमदार पासकल धनारे हे स्वत: गोविंदा पथका बरोबर राहून त्यांना मार्गदर्शन करत होते. नगराध्यक्ष स्मिता वळवी, उप नगराध्यक्ष सुरेश भोये, पोलीस निरिक्षक कैलास बर्वे यांनी गोविंदांना पारितोषिके वाटली.
वंदे मातरम्चे वर्चस्व
बोईसर : येथे ५५ सार्वजनिक तर ४५ खासगी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले. शहरातील पारंपारिक दहिहंड्या पैकी पांच वंदे मातरम पथकाने सकाळी अगदी शिस्तबध्द पद्धतीने ५ ते ६ थर लावून मोठया उत्साहात फोडल्या बोईसरच्या वंदे मातरम पथकाने भावेश मोरे यांच्या पालकत्वाखाली जितू पाठक, मिलिंद कोती, विजय रावते यांच्यासह
सुमारे ८० गोविंदाच्या सक्रिय सहभागाने बोईसर ग्रामपंचायत समोरील, नवापूर नाका, महेंद्रपार्क, शिवकला आर्केड व भंडारवाडा या पाच पारंपारिक दिहीहंड्या फोडल्यात. तर बोईसर च्या अनेक गृह संकुलात, चाळी व नागरी वसाहतीतील दहीहंड्या त्या त्या भागातील गोविंदा नि फोडल्या.
विक्र मगड तालुक्यात गोपाळकाला उत्साहात
विक्र मगड : या शहरासह तालुक्यातील सवादे, सुकसाळे, साखरे,दादडे, विक्र मगड, तलवाडा, आलोंडे, मलवाडा, भोपोली, उपराळे, बांधण, देहेर्जे, ओंदे, आदी गाव- खेडयापाडयासह नविन चालीरितीप्रमाणे तर काही भागात पारंपारीक पध्दतीने गोपाळकाला थाटामाटात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील चारही मुख्य नाक्यांपासूनपूर्वीची जुनी बाजारपेठ, पाटीलपाडा आदी, परिसरात ३० ते ४० दहीहांडया बांधण्यात आल्या होत्या. तर तालुक्यात ३०० ते ३५० हांडया बांधण्यात आल्या होत्या, त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे राजकीय पक्षासह, व्यापारी, पोलिस कार्यालय आदींचा समावेश होता.
कुडूसच्या दहीहंडीत धार्मिक एकोपा
वाडा: तालुक्यातील मानाची समजली जाणारी शिवसेना पुरस्कृत व नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष गोविंद( मामा) पाटील यांच्या दहीहंडीत धार्मिक एकोपा पाहायला मिळाला.विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचे नेते इरफान सुसे यांच्याकडून या दहीहंडीला ५१ हजार रु पयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले होते.त्यामुळे या दहीहंडीत धार्मिक एकोपा पाहायला मिळाला. शिवसेना पुरस्कृत नवनिर्माण कला, क्र ीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गोविंद ( मामा) पाटील यांच्यावतीने येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हे तिचे ११ वे वर्ष आहे. यावेळी शेकडो प्रेक्षकांनी हजेरी दर्शवून दहीहंडीचा उत्सव साजरा केला. यावेळी ग्रामीण भागातील एकूण पंधरा गोविदा पथकाने हजेरी लावून सहाव्या थरापर्यंत सलामी दिली.
विरारमध्ये युवा आमदार दहीहंडीचा थरार
नालासोपारा : उत्सव म्हंटला की, त्याला विविध अंग असतात गेली. गेली ११ वर्ष तालुक्यातील सर्वात मोठा दहिकाला साजरा करणाऱ्या श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ विरार मनवेल पाडा येथे सोमवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला. यावेळी केरळ मधील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला गेला. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्स्व मंडळाच्यावतीने सोमवारी युवा आमदार दहीहंडीचे आयोजन मनवेल पाडा येथे करण्यात आले होते. त्यात १२५ पथक सहभागी झाले होते. त्यात ५ महिला पथक होते. त्यांच्यातील चुरशीमुळे या उत्सवातील रंगत वाढली होती.
आदिवासींमध्ये पारंपरिक उत्साह
मोखाडा : शहराबरोबरच ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्मअष्ठमीचा उत्सव जलोषात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला दिवस भर मंदिरातून भजन कीर्तन श्रीकृष्ण नामाचा जयघोष ऐकायला मिळाला. सकाळपासून मंदिरासमोर भाविकांची गर्दी होती. विद्युत रोषणाई फुलांची
आरस नक्षीदार रांगोळी यामुळे मंदिरांची शोभा वाढली होती तसेच सकाळ पासून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचा जल्लोष सर्वत्र पहावयास मिळत होता कोर्टाच्या आदेशाचे पालन करून मोखड्यासह खेडोपाड्यात आदिवासी बांधवानी पारंपरिक उत्साहात दहीहंडी उत्सव
साजरा केला.
जव्हार शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्साहात
जव्हार : या शहरात ठिकठिकाणी बालगोविदांचा उत्साह पाहायला मिळाला. यशवंत नगर मोर्चा, गांधीचौक, तारपा चौक, मागलेवाडा, अर्बन बँक, या ठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. शहरातील जयबाजरंगबली, दर्यासारंग गोविंदा पथक व इतर पथकांनी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस स्टेशन समोर परेश पटेल, नरेश महाले व इतर शेकडो धर्मवीर कार्यकर्ते मिळून मोठया जल्लोषात हंड्या फोडल्या.
तेथेच जयबजरंगबली व दर्यासारंग गोविंदा पथक ने वेगळी थीम सादर करून आपले कला गुण दाखविले, तसेच जयबजरंगबली पथकाने नक्षली हल्ल्यात आपले दोन्ही पाय गमावणाºया रामदास भोगडे या जवानांवर थीम सादर करून सगळ्यांची मने जिंकली, मोठया प्रमाणात या पथकाला बक्षिसे देण्यात आली त्याचे नेतृत्व ओमकार कानोजा करीत होते. तसेच दर्यासारंग गोविंदा पथकाने तिरंगा फडकवून सलामी दिली या पथकाचे नेतृत्व दर्शन तमोरे यांनी केले होते. तसेच शिरोशी गावात गोपाळकाला व श्री कृष्णा जन्मअष्टमीच्या रात्री पाळणाघर बांधून पारंपारिक आदिवासी गाणे गाऊन रात्रभर गौरीनाच केला गेला. त्यांनी सात थरांचा उंच मनोरा करून दहीहंड्या फोडल्या. शिरोशी गावातील युवकांनी उंच लाकडी खांब उभारून दहीहंडी बांधण्यात आली होती. त्या खंबा भोवती पूर्ण चिखल करून त्या चिकट खंबावर चढून युवकांनी दहीहंडी फोडली व सगळ्यांची मने जिंकली.
कासामध्ये दहीहंडी उत्साहात
कासा : येथे दही हंडी उत्साहात साजरी करण्यात आली. आसपासरच्या खेड्यापाड्यात पारंपरिक पद्धतीने ती साजरी केली गेली.गोकुळ अष्टमीच्या दिवशी तेथे भजन कीर्तन केले जाते. तर दही हंडी गावा गावात उत्साहात साजरी केली जाते. आमदार अमित घोडा, सरपंच रघू गायकवाड उपस्थित होते.
याबरोबर मालिका कलाकार अभिजित चव्हाण, संतोष पुसाळकर आले होते त्यामुळे गावकºयांनी सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती. कासा सरपंचांच्यावतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ती फोडण्यासाठी परिसरातील अनेक गोविंदा पथके आली होती.
भरउन्हातही गोविंदांचा अमाप उत्साह
बोर्डी : खिडकीतल्या ताई-अक्का वाकू नका, दोन पैसे देतो, मला भिजवून टाका म्हणत, हुलकावणी देणाºया पावसावर गोविंदा पथकांनी गाण्यातून कोटी केली. या भर उन्हातही त्यांचा आनंद तसूभरही कमी झाला नव्हता. समोर बांधलेल्या हंड्या फोडत ही पथकं विसर्जन घाटापर्यंत पोहचल्याचं चित्र गावोगावी पाहायला मिळाल.
ग्रामीण भागात पखवाज, टाळ या वाद्यांच्या तालावर भजनं, गवळणीचे सूर घुमत होते. तर कुठे बँजो, स्पीकरमधील सिनेसंगीतावर थिरकणाºया गोविंदा पथकांनी नाचाचा आनंद लुटला. डहाणू शहरातील मूक बधीर बाल विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून व दहीहंडी फोडून हम भी, कुछ कम नही हे दाखवून दिले.