गोविंदा पथके सज्ज...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:19 AM2017-08-12T05:19:05+5:302017-08-12T05:19:11+5:30
संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे.
- राहुल वाडेकर
विक्रमगड : संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे.
दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़ कृष्णजन्माच्या दुसºया दिवशी फोडण्यांत येणाºया दहीहांडीसाठी गेल्या काही दिवसांपासून गोविंद पथके सतत सराव करीत आहेत़ १५ आॅगस्ट रोजी होणाºया दहीकाल्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत़ मात्र दरवर्षी कृष्णजन्म आणि दहीहांडीच्या दिवशी जमके बरसणाºया पावसाने दडी मारल्यामुळे गोविंदांमध्ये तो मंगळवारी नक्कीच बरसेल असा आशेचा किरण डोकावतो आहे. यंदा डॉल्बी, डीजे नसेल त्यामुळे किमान पावसाची सर तरी यावी अशी तिची इच्छा आहे.
सोमवारी साजºया करण्यांत येणाºया दहीकाला उत्सवात जिल्ह्यातील अनेक गोविंदापथके सहभागी होत आहेत़ ही पथके विक्रमगड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून समित्रमंडळाच्या मार्गदर्षखाली सहभागी होत आहेत़ शहराच्या संख्येने ग्रामीण भागात गोविंदा पथकांची संख्या कमी आहे़ यंदा हा दहीकाला उत्सवालाही महागाईची झळ बसलेली आहे़ दहीहांडीसाठी लागणारी हंडी पूर्वी ५० रुपयाला मिळत होती आता तिचे दर आकारनुसार ५०० रुपयांपर्यंत भिडले आहेत. तर फळांच्या-फुलांच्या किंमतही भरमसाट झाल्या आहेत. श्रावण महिना असल्याने महिनाभर असे अनेक सण, उत्सव येत असतात व हा उपवासाचा महिना असल्याने फळांच्या व फुलांची मागणी वाढलेली आहे़ अशाही परिस्थितीत अनेक दहीकाला उत्सव मंडळांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो़ मात्र पावसाचा जोर कसा राहील या चिंतेत गोंविदा पथके आहेत़ कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.
आजही तेवढ्याच भक्तीभावाने सण,उत्सव एकत्ररित्या जोपासले जातत़ त्याचाच एक भाग कृष्ण जन्म उत्सव,दहीहंडी हा पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो. विक्रमगड व परिसरात साºया तालुक्यात जवळ जवळ १०० ते १५० मंडळे आपल्या गाव-खेडयापाडयात व शहरात बांधलेल्या हंड्या फोडून मोठा जल्लोशात आनंद व्यक्त करीत असतात़ ग्रामीण भाग असला तरी येथेही मोठया रकमेची बक्षिसे लावून दहीहांडी उत्सव साजरा न करिता सर्वांनी एकत्र जमून एकोप्याने एकच दहीहांडी बांधायची व ती फोडण्याचा चान्स सर्वांना देवून आनंदाने पारंपारिक पध्दतीनेच हा उत्सव आजही चालू आहे़
तालुक्यात जवळ जवळ २०० ते ३०० हंड्या बांधल्या जातात़ या भागात जास्तीत जास्त तीन ते चार थरापर्यतच हंडयांची उंची असून सुरक्षिततेच्या कारणास्तव उंच हंड्याच बांधल्या जात नाही़ अलीकडच्या आधुनिग युगामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक विविध बदल झालेले आहेत़ त्यानुसार जरी पारपंरिक पध्दत जपली जात असली तरी त्यास आधुनिक युगाची थोडीफार का होईना सांगड घातली जातेच लग्न समारंभ,वाढदिवस,इतर कार्यक्रमांना डीजेची मोठी मागणी असते व आता ही फॅशन व प्रतिष्ठेचा प्रश्न मानला जात असल्याने त्याची मागणीही मोठी झाली आहे़ त्यानुसार आता दहीहांडीलाही डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आज ग्रामीण भागातही पहावयास मिळते. परंतु यंदा त्यावर बंदी आहे. ग्रामीण भागातील गोविंदा मंडळे दुसºया गावातील दहीहांडया फोडण्यासाठी न जाता आप-आल्याच गावात हा उत्सव साजरा करतात़
पूर्वी विक्रमगड शहरात साºया गाव-पाडयांतील जनता दहीहंडी पाहाण्यासाठी येत होती मात्र आता सर्वच गावात व खेड्यापाड्यात दहीहंडी उत्सव साजरा करत असल्याने काहीशा प्रमााणात विक्रमगड शहरातील गर्दी ओसरु लागली आहे़
काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मंगळवारी अशीच परिस्थिती राहाण्याची शक्यता असल्याने या दिवशी मिळेल त्या घरातून पाण्याचा वर्षाव केला जातो हंड्या सजविण्यासाठी मंडळ खबरदारीची भूमिका घेत असतात. पोलिसांनीही हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सूचना केल्या आहेत़