दांडेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ

By admin | Published: March 9, 2017 02:18 AM2017-03-09T02:18:13+5:302017-03-09T02:18:13+5:30

विद्यार्थ्यांनी स्वत:मधील सुप्त क्षमता लक्षात घेवून स्वत:चा विकास साधावा आणि बदलत्या स्वरूपात निर्माण झालेल्या विविध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनोपंत

Graduation ceremony at Dandekar College | दांडेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ

दांडेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ

Next

पालघर : विद्यार्थ्यांनी स्वत:मधील सुप्त क्षमता लक्षात घेवून स्वत:चा विकास साधावा आणि बदलत्या स्वरूपात निर्माण झालेल्या विविध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड्. जी. डी. तिवारी यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ ४ मार्च रोजी साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड्. जी. डी. तिवारी, संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, धनेशभाई वर्तक व प्रभारी प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कु. अश्विनी भानुशाली या विद्यार्थीनीने तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र) परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या पदवीदान समारंभास कला, वाणज्यि, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र तसेच पदव्युत्तर शाखेतील ५०० विद्यार्थी उपस्थित होते.
त्यांचे कौतुक करण्याकरिता संस्थेचे सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. सावे यांनी केले. प्रा. महेश देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.तर प्रा. अनघा पाध्ये यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Graduation ceremony at Dandekar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.