आराखडे मान्यतेसाठी १५ आॅगस्टला ग्रामसभा
By admin | Published: July 29, 2016 02:49 AM2016-07-29T02:49:20+5:302016-07-29T02:49:20+5:30
पालघर जिल्ह्यात आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय तयार करावयाच्या विकास आराखड्याना येत्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत मान्यता मिळणार असून जिल्हा
- हितेन नाईक/निखिल मेस्त्री, पालघर/नंडोरे
पालघर जिल्ह्यात आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय तयार करावयाच्या विकास आराखड्याना येत्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत मान्यता मिळणार असून जिल्हा,तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागलेली आहे.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. २०१५-२०१६ या वर्षात पालघर जिल्ह्याला या अंतर्गत कोट्यवधीचा निधी उपलब्ध झालेला आहे. मागील वर्षात अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या खात्यात पेसांतर्गत ३७ कोटीचा निधी जमा झालेला आहे. याचबरोबरीने ग्रामपंचायतींना मिळणार स्वनिधी,ग्रा. प.नी केलेल्या चांगल्या कामिगरीबद्दल शासनाकडून प्राप्त होणारी बक्षिसे, ग्रामीण रोजगार हमी योजना निधी तसेच ग्रा. पं.ना विविध स्तरातून मिळणार सी एस आर फंड अशा एकत्रीत निधींचा विनियोग कसा करावा याचा विचार ग्रामविकास आराखड्यात असणार असून गेल्या तीन महिन्यांपासून हे ग्राम विकास आराखडे बनवण्याचे काम वेगात सुरु आहे तसेच या आराखड्यावर ग्रामपंचायतस्तरापासून जिल्हास्तरीय समितीचे संपूर्ण नियंत्रण राहणार आहे.हा आराखडा प्रारूप वार्षिक व पंचवार्षिक असा असणार आहे. चार वर्षाचा बृहद आराखडा तयार करून यानंतर यात प्राधान्यक्र माने समाविष्ट असलेल्या कामांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही प्रकिया संपूर्ण जिल्ह्यात सुरु झालेली असून येत्या आॅगस्ट मध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत या आराखडयास मान्यता देऊन तालुकास्तरीय पंचायत समिती गणकडे तांत्रिक छाननीसाठी हा ग्राम विकास आराखडा पाठविण्यात येईल.पंचायत समिती गण हा विकास आराखडा तयार करण्यासाठी विचारात घेण्यात आला असून तांत्रिक छाननी नंतर हा आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल व ती त्याचे परीक्षण करून निधी व नियोजनाची तालुकानिहाय एकत्रीत संक्षिप्त टिपणी करून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब करेल.
हा आराखडा तयार करताना सरपंच सह उपसरपंच, सदस्यगण तसेच गावातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला नियोजनासाठी समाविष्ट केल्यामुळे ग्रामसभा सिक्र यही होणार आहेत तसेच गावपातळीवरील कामे ग्रामस्थांनी ठरावल्याप्रमाणेच होणार आहेत.