ग्रामसभा होणार कॅमेराबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:10 AM2017-08-14T03:10:20+5:302017-08-14T03:10:20+5:30

ग्रामसभांचे कामकाज इन कॅमेरा व्हावे ही मागणी सत्यात उतरणार आहे.

Gram Sabha will be held in camera | ग्रामसभा होणार कॅमेराबद्ध

ग्रामसभा होणार कॅमेराबद्ध

Next

अनिरूध्द पाटील ।

बोर्डी : ग्रामसभांचे कामकाज इन कॅमेरा व्हावे ही मागणी सत्यात उतरणार आहे. या बाबतचे परिपत्रक पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून संबंधीत तालुक्यातील पंचायत समितीच्या गट विकास अधिकाºयांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनी घेण्यात येणाºया ग्रामसभांपासून त्याची अंमलबाजवणी होणार असल्याचे डहाणू पंचायत समिती गटविकास अधिकारी राहूल धूम यांनी सांगितले.
या बाबतची मागणी नागरिकांनी ग्रामविकास विभागाकडे अनेक वर्षांपासून केली होती. त्यानुसार ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ग्रामसभांचे चित्रीकरण करण्यात यावे असे परिपत्रक काढले आहे. संबंधीत जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बाबत सूचित करण्यात आले असून त्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाºयांशी पत्रव्यवहार केला आहे.
त्यामुळे डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायती मध्ये स्वातंत्र्यदिनी होणाºया ग्रामसभांचे प्रथमच चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे सत्ताधाºयांकडून होणारी मनमानी, दोन गटात होणारा वादंग आणि मारामारी यांच्यावर अंकुश येणार आहे. शिवाय ग्रामसभेपुढे ठराव संमत करून इतिवृतात त्याची नोंद न करणाºया व न झालेल्या ठरावांची इतिवृत्तात नोंद करण्याची मखलाशी करणाºया ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांचे धाबे दणाणर आहेत.
कोरम पूर्ण न होताच, तो झाल्याचे भासविणाºयांना खºया अर्थाने चाप बसणार आहे. या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून ग्रामसभांना होणारी उपस्थिती यामुळे वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींकडे व्हिडिओ कॅमेरे आहेत. मात्र ज्यांच्याकडे नसतील त्यांनी ते भाडेतत्वावर उपलब्ध करावेत या बाबत ग्रामपंचायत
फंडातून निधींची तरतूद करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
> ग्रामसभांचे चित्रीकरण व्हावे या बाबतचे परिपत्रक संबंधीत ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले असून स्वातंत्र्य दिनी घेण्यात येणाºया ग्रामसभांपासून त्याची अंमलबाजवणी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
-राहुल धूम,
गटविकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती

Web Title: Gram Sabha will be held in camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.