ग्रामदान मंडळांना ग्रा.पं.चा दर्जा द्या
By admin | Published: July 30, 2015 10:49 PM2015-07-30T22:49:42+5:302015-07-30T22:49:42+5:30
विक्रमगड तालुक्यात माण, वाकी तसेच नागझारी व ठिकाणी ग्रामपंचायती ऐवजी ग्रामदान मंडळे आहेत. ग्रामपांयतीला मिळणारा निधी व ग्रामदानास मिळणाऱ्या निधीमध्ये भिन्नता आहे.
तलवाडा : विक्रमगड तालुक्यात माण, वाकी तसेच नागझारी व ठिकाणी ग्रामपंचायती ऐवजी ग्रामदान मंडळे आहेत. ग्रामपांयतीला मिळणारा निधी व ग्रामदानास मिळणाऱ्या निधीमध्ये भिन्नता आहे. त्यामुळे गावाच्या, खेडयाच्या व शहराच्या विकासाच्या दृष्टीेन ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतीप्रमाणेच दर्जा दिला जावा असल्याची मागणी मंडळातील रहीवाशांनी केली आहे.
विक्रमगड तालुक्यामध्ये एकुण ३९ ग्रामपंचायती व तीन ग्रामदान मंडळांचा समावेश आहे. त्यामध्ये वाकी, माण व नागझरी या ठिकाणी ग्रामपंचायती एवजी पूर्वापार ग्रामदान मंडळामार्फत कारभार चालविला जातो. जरी या ग्रामदान मंडळात ग्रामपंचायतीप्रमाणे ग्रामसेवकाचे कामकाज चालत असले तरी इतर व्यवहार हा वेगळया पध्दतीत असतो. ग्रामपंचायतीला येणारा निधी ग्रामदान मंडळाला नसतो त्यामुळे ग्रामदान मंडळाची रचना व ग्रामपंचायतीची रचना वेगळी वेगळी आहे. ग्रामदान मंडळात अध्यक्ष कारभार पाहतो तर ग्रामपंचायतीचा सरपंच. ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने होते तर ग्रामदान मंडळाची गावातील लोक कार्यालयात एकत्र येऊन अध्यक्ष पदाकरिता उभे असलेल्या उमेदवारांस हात वर करून खुल्या मतदानाने निवडून देतात. असा वेगळा वेगळा कारभार ग्रामदान मंडळाचा व ग्रामपंचायतीचा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या मानाने ग्रामदान मंडळाची विकास कामे त्या गतीने होत नाहीत. (वार्ताहर)