ग्रामसेवक आंदोलनाने कामे ठप्प; दखल नाही, आंदोलकांची झाली गोची, जनता धरली गेली वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:36 AM2018-09-05T05:36:59+5:302018-09-05T05:37:10+5:30
पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत.
मोखाडा : पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत. मात्र या आंदोलनाला मंगळवारी दिवस होवूनही कोणताही तोडगा न निघाल्याने सर्व कामकाज ठप्प झाले असून जनता वेठीस धरली गेली आहे. पाटील यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने ग्रामसेवकांच्या या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांची कोंडी झाली आहे.
पाटील हे वादग्रस्त अधिकारी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत याशिवाय ग्रामसेवकाची आर्थिक पिळवणूक करणे, दौरे करत असताना पैसे जमा करणे असे आरोप पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटनेने केले असून तसे पत्र ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे मात्र यानंतरही कसलीच कार्यवाही यावर न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून ग्रामसेवक ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले असल्याने जिल्हाभरातील कामे रखडली आहेत. मात्र असे असतांनाही यावर तोडगा काढण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही. उलटपक्षी ठाणे जिल्ह्यातील आणि काही पालघर जिल्ह्यातीलही पदाधिकारी पाटील यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामसेवकांच्या आंदोलनाविरोधात श्रमजीवीचे धरणे
वाडा : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक गेल्या कित्येक दिवसांपासून सामुदायिक रजेवर गेल्यामुळे ग्रामपंचायतींचे प्रशासन ठप्प झाल्याने जनतेच्या कामांचा खोळंबा झाला आहे. या विरोधात श्रमजीवी संघटनेने आक्र मक पवित्रा घेतला असून या सर्व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पंचायत समितीच्या आवारात धरणे धरले.
पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अशोक पाटील यांच्या झालेल्या नियुक्ती विरोधात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक बेमुदत सामुदायिक रजेवर गेले आहेत. पाटील हे आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामसेवकांना वेठीस धरत असल्याचे कारण सांगून ग्रामसेवकांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.
तर ग्रामसेवकांच्या सामुदायिक रजेमुळे मुलांच्या शैक्षणिक दाखल्यांपासून ते गोरगरीब जनतेच्या अनेक कामांचा खेळखंडोबा झाल्याने श्रमजीवीने हा मुद्दा उचलून मंगळवारी पंचायत समितीच्या आवारात धरणे धरले. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांना देवून लेखी आश्वासनानंतर आंदोलनमागे घेण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्र ेटरी विजय जाधव यांनी केले तर आंदोलनात तालुका अध्यक्ष जानूभाउ मोहनकर, तालुका सचिव सरिता जाधव, मनोज काशिद, कामगार संघटना अध्यक्ष रवींद्र चौधरी, शेतकरी घटक प्रमुख किशोर मढवी, उपाध्यक्ष सुरेश पराड, संघटक बाळाराम पाडोसा आदींसह शेकडोंच्या संख्येने श्रमजीवी उपस्थित होते.
विक्रमगड पं.स.समोर श्रमजीवीचा ठिय्या
विक्रमगड : ग्रामस्तारावरून विकासाचे काम करणारी यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत परंतु या तालुक्यातील ग्रामसेवकच गेल्या २१ तारखेपासून बेमुदत रजेवर गेल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचा विकास खुंटला आहे. या बेमुदत रजेमुळे अनेक विकास कामे खोळबली असून विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक दाखल्यासाठी वाट पहावी लागत आहे असा आरोप श्रमजिवीचे जिल्हा सरचिटणीस कैलास तुबडा यांनी केला आहे.
तसेच आबिवली ग्रामसेवकवर कारवाई कधी करणार, महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत टेटवाळी व सावरोली या ठिकाणी रस्ताच्या कामात मजूराना २१ रु पये ते २९ रु पयापर्यत रोजगार मिळाला असून मजूराची फसवणुक केली आहे यांना नियमा प्रमाणे मजुरी द्या या मागण्यांसाठी मंगळवारी विकमगड पंचायत समिती समोर श्रमजिवी संघटनेतर्फे ठिय्या आदोलन करण्यात आले.
या मागण्या मान्य होत नाहीत. वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत तोपर्यत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा श्रमजिवी संघटनेने दिला. या आंदोलनात शंकर भोये, लक्ष्मण पडवळे, रूपेश डोले, कासट ताई, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित
होते.