ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Published: May 29, 2016 02:44 AM2016-05-29T02:44:41+5:302016-05-29T02:44:41+5:30
पंचायत समिती आवारामध्ये ग्रामसेविका वंदना चाबके या ग्रामसेविकेने गटविकास अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून पंचायत समितीच्या प्रशासन विभागात किटकनाशक औषध प्राशन
विक्रमगड : पंचायत समिती आवारामध्ये ग्रामसेविका वंदना चाबके या ग्रामसेविकेने गटविकास अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून पंचायत समितीच्या प्रशासन विभागात किटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंंतु कर्मचाऱ्यांनी वेळेत दवाखान्यात दाखल केल्यामुुळे तिचे प्राण वाचले.
एप्रिल २०१५ या वर्षी ग्रामसेविकेने प्रसूतीसाठी रजा घेतली होती मात्र विक्रमगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी रजा मंजूर न करता तिला एक वर्षाचा पगार दिलेला नाही. त्यामुळे वैतागलेल्या या ग्रासेविकेने अखेर आत्महत्याचा प्रयत्न केला. तिला नेहमीच गटविकास अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास देण्यात येत होता.
अनेक अर्ज करण्यात आले होते. प्रसूती रजा नामंजूर करणाऱ्या व एक वर्षाचा पगार न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी या ग्रामसेविकेने केली आहे. तिच्यावर ग्रामीण रूग्णालयातउपचार सुरू आहेत या महिलेवर उपचार सुरू असून तब्येत व्यवस्थीत आहे. असे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी महिलांमध्ये संतापाची भावना आहे. (वार्ताहर)