सुपेहमध्ये काकोडकरांची ग्रेट भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:32 AM2018-01-17T00:32:51+5:302018-01-17T00:32:56+5:30
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुपेह हायस्कुलचा ९८ वा वर्धापन दिन गुरु वार ११ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी पदमविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अशोक शहाणे
बोर्डी : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुपेह हायस्कुलचा ९८ वा वर्धापन दिन गुरु वार ११ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी पदमविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष अशोक शहाणे हे अतिथी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी आणि विभागीय सचिव प्रभाकर राऊत, सरपंच प्रेरणा राठोड आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या वेळी विद्यार्थ्यांच्या पुष्परचना, चित्रकला व रांगोळी स्पर्धांच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी आचार्य भिसे व चित्रे गुरु जींच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी श्रीवर्धन, गोवर्धन, शौर्यिवर्धनी, गोवर्धन, तेजविर्धनी, राजवर्धन, यशिवर्धनी आणि ज्ञानविर्धनी या विद्यार्थ्यांच्या आठ संघांनी उपस्थितांना मानवंदना दिली आणि संचलन व कवायतींमधून मान्यवरांची मनं जिंकली.
प्राचार्या आशा वर्तक यांनी शाळेचा गौरवशाली इतिहास प्रस्ताविकेतून मांडला. या वेळी अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचा सपत्नीक सत्कार डॉ. गोसावी यांनी आदिवासी पेंटिंग देऊन केला.
दरम्यान, क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या वैयिक्तक व सांघिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर स्फूर्तीसागर या स्मर्णिकेचे प्रकाशन डॉ. काकोडकरांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने विविध सुंदर कवायती सादर केल्या. तसेच सांस्कृतिक कार्यक्र माला विशेष पसंती मिळाली. या वेळी मोठ्या संख्येने पालक आणि नागरिकांनी गर्दी केली होती.
शंभर वर्षात संस्थेने विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य महत्वाचे असून या संस्थेची शतकीय वाटचाल चिरतरुण असल्याचे द्योतक आहे. शिक्षणाचा दर्जा टिकविण्यासाठी शाळेतील मार्गदर्शन महत्वाचे असून आचार्य भिसे व आचार्य चित्रे गुरुजीं यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठे योगदान दिल्याचे कौतुक अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
खेळामुळे संघ व्यवस्थापन शिकलो. हाच यशस्वीततेचा गुरु मंत्र असल्याचे प्रमुख अतिथी एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष सहाणे यांनी सांगितले. आदिवासी भागातील या संस्थेचे शिक्षणाचे कार्य उल्लेखनीय असून आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि देणगीदारांमुळे प्रगती झाल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.