प्रजासत्ताक दिनाची तयारी जय्यत
By admin | Published: January 26, 2017 02:44 AM2017-01-26T02:44:04+5:302017-01-26T02:45:19+5:30
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा अशी देशभक्तीपर गीतं आणि घोषणांनी प्रजासत्ताक दिनी आसमंत दुमदुमणार आहे.
डहाणू : विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा अशी देशभक्तीपर गीतं आणि घोषणांनी प्रजासत्ताक दिनी आसमंत दुमदुमणार आहे. संपूर्ण देश त्याच्या स्वागताकरिता सज्ज झाला असून ध्वजवंदनाच्या रंगीत तालीम बुधवारी उत्साहात पार पडल्या.
डहाणू तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महत्वाच्या शासकीय कार्यालयाच्या आवारातील ध्वजस्तंभांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी व पोलीस अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, न्यायालय, के. एल. पोंडा हायस्कूल मैदान आदींचा त्यामध्ये समावेश होता. तर विविध शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणावर ध्वजरोहण कार्यक्र मासाठी मैदानाची आखणी करण्यात आली. तर ध्वजाला सलामी देण्याकरिता एनएसएस, स्काऊट-गाईड, नेव्ही आदी विद्यार्थी पथकांची रंगीततालमही बुधवारी पार पडली. त्यात विविध घोषणा व देशभक्तीपर गीत गाऊन सराव करण्यात आला. त्याच प्रमाणे गावागावात फिरणाऱ्या प्रभातफेरी मार्गावर स्वच्छाता मोहीम राबविण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक जोमाने कामाला लागलेले होते. विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्र माची जय्यत तयारी सुरू होती. ध्वजसंहितेप्रमाणे ध्वजारोहण पार पडावे याकरिता वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या
आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेतील दुकानं ध्वजापासून ते शर्टाला लावण्याचे फ्लॅग टॅग आदिंनी सजली होती. या वस्तूंमध्ये वाहनांवर तसेच घरात, कार्यालयात ठेवण्यासाठी तसेच प्रभातफेरींमध्ये हाती घेण्यासाठी लहान आकारातील ध्वजांचा समावेश होता. (वार्ताहर)