पाच हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:00 AM2017-08-15T03:00:29+5:302017-08-15T03:01:17+5:30

देशातून ब्रिटिशांना हाकलून देण्याच्या ^चले जाव चळवळी दरम्यान हौतात्म्य पत्करणाºया हुतात्म्यांना आज हुतात्मास्तंभाजवळ पालकमंत्री, नगराध्यक्ष आणि पालघरवासीयांनी विनम्रपणे श्रद्धांजली वाहिली.

Greetings to five martyrs! | पाच हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन!

पाच हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन!

Next

पालघर : देशातून ब्रिटिशांना हाकलून देण्याच्या ^चले जाव चळवळी दरम्यान हौतात्म्य पत्करणाºया हुतात्म्यांना आज हुतात्मास्तंभाजवळ पालकमंत्री, नगराध्यक्ष आणि पालघरवासीयांनी विनम्रपणे श्रद्धांजली वाहिली. या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत.
सातपाटी हे राष्ट्रीय चळवळीचे तालुक्यातील मोठे केंद्र असल्याने रामचंद्र पागधरे, बाबुराव पाटील, काशिनाथ पागधरे, पंडित मेहेर, तर महिला रणरागिणी मंजुळा पागधरे, तुळसा पाटील, हिरुबाई मेहेर तसेच नांदगाव मधून ह. दा. राऊत गुरुजी सोबत गोविंद गणेश ठाकूर,नरोत्तम पाटील, का.दा. मोरे, इ. क्र ांतिकारक तरुणांसह सात ते आठ हजारांचा जनसागर जमला होता.
पालघर कचेरी काबीज करण्यासाठी क्रांतीकारकांचे हात शिवशिवत असल्याने चले जावं च्या घोषणांनी सारे शहर दुमदुमले होते. या दरम्यान नांदगावचे चिंतू नाना पाटील ह्यांच्याशी ब्रिटिश अधिकारी अल्मेडा यांचे भांडण झाले. ह्यावेळी इंग्रजांनी लाठीहल्ला सुरु केल्याने नांदगावच्या सेवादलाचा शाखाप्रमुख गोविंद ठाकूर ह्यांनी हातात तिरंगा हातात घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत कचेरीकडे कूच केली. त्यामुळे संतापलेल्या अल्मेडा ह्यांनी झाडलेली गोळी गोविंद ठाकूर ह्यांच्या छातीत घुसली आणि ते खाली कोसळले. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी हातातील ध्वज खाली पडू दिला नाही. यामुळे धुमश्चक्री उडाली व झालेल्या गोळीबारात नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी चे काशिनाथभाई हरी पागधरे, पालघरचे रामप्रसाद भीमशंकर तेवारी, सालवड चे सुकुर गोविंद मोरे, मुरब्याचे रामचंद्र महादेव चुरी, ह्या पाच क्र ांतीकारकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता. त्यासाठी सुंदर फुलांनी हुतात्मा स्तंभ सजविण्यात आला होता. ह्या पाच हुतात्म्यांच्या रक्तात न्हाऊन निघालेला तिरंगा आज पूजनासाठी हुतात्मास्तंभाजवळ ठेवण्यात आला होता. दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी हुतात्म्यांना दिन खून के हमारे यारो न भूल जाना, या गीताद्वारे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आली. यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वणगा, आमदार अमति घोडा, आ.पास्कल धनारे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, उपनगराध्यक्ष रईस खान, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे,मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, तहसीलदार महेश सागर उपस्थित होते. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, हॉटेल्स, उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले होेते.
>सगळ्यांनाच पडला विसर
ज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यांच्या हौतात्म्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा विसर नगरपालिकेला, जिल्हा परिषदेला व पालकमंत्र्यांनाही पडल्याने अन्य कुठल्याही कार्यक्र माचे आयोजन करण्यात न आल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

Web Title: Greetings to five martyrs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.