ग्रीडची वाहिनी कोसळली; भरपाईशिवाय पुन्हा उभारू न देण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:26 AM2018-07-03T03:26:33+5:302018-07-03T03:26:41+5:30
विक्रमगड तालुक्यातील हातने गावावरून जाणारी पॉवर ग्रीडची ४०० केव्ही व ४ लाख व्होल्टची वाहिनी तुटली असून शेतात काम करणारे १० शेतकरी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.
तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील हातने गावावरून जाणारी पॉवर ग्रीडची ४०० केव्ही व ४ लाख व्होल्टची वाहिनी तुटली असून शेतात काम करणारे १० शेतकरी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.
दोनच महिन्यापूर्वी ही लाईन चालू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असून ते शेतात जाण्यास घाबरत आहेत. जो पर्यंत सुरक्षिततेची हमी ग्रीड देत नाही तो पर्यंत आम्ही हि केबल जोडू देणार नाही अशी भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. या गावातील शेतकरी शुक्र वारी संध्याकाळी शेतात काम करीत असतांना जोरदार स्फोट झाला त्यानंतर त्यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. पॉवर ग्रीड कंपनीची वीज वाहिनी तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रीडच्या अधिकाºयांना कळविले तरी तिचा एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहचला नव्हता आज सकाळी ग्रीडचे अधिकारी आपला लवाजमा घेऊन गावात पोहचले असता त्यांना शेतकºयांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला की या घटनेला १८ तास उलटले आणि तुम्ही आता येता? ते केबल जोडण्यासाठी जात असतांना गावकºयांनी त्यांना आमच्या सुरक्षिततेची हमी द्या नंतर केबल जोडा असे सांगून त्यांना काम करण्यास मज्जाव केला. आमच्या शेतात तुम्ही टॉवर लाईन टाकली आमची झाडे तुम्ही तोडली त्याची नुकसान भरपाई दिली नाही ती अगोदर द्या तरच आम्ही तुम्हला हे काम करू देऊ असे बजावले. या बाबत पॉवर ग्रीड कंपनीच्या अधिकाºयांना विचारले असता त्यानी पत्रकारांशी काहीही बोलण्यास नकार दिला.
मी व माझे कुटुंबिय शेतात काम करीत असतांना पॉवर ग्रीडची विद्युत वाहिनी तुटल्याने मोठा स्फोट झाला. ही वाहिनी शेजारच्या शेतात पडल्याने आम्ही वाचलो ती जर या शेतात पडली असती तर आमचा मृत्यू अटळ होता. यामुळे आम्हाला आता शेतात काम करण्याची भीती वाटते.
-शशिकांत तारवी,
प्रत्यक्षदर्शी शेतकरी
आमच्या शेतात पॉवर लाईन टाकतांना आमच्या मालकीची झाडे तोडली त्याची नुकसान भरपाई अद्याप पर्यंत मिळाली नाही. पॉवर ग्रीडच्या अधिकाºयांनी आम्हला लेखी लिहून दिली आहे की येत्या एक महिन्याचा आत शेतकºयांची नुकसान भरपाई देऊ.
-नितीन डोळे,
प्रकल्प बाधित शेतकरी