जव्हारमध्ये वाढतेय गुलाबी थंडी
By admin | Published: February 6, 2016 02:03 AM2016-02-06T02:03:51+5:302016-02-06T02:03:51+5:30
पालघर जिल्हातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि पर्यटन स्थळ व एैतिहासीक वारसा लाभलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडीची लहर सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासु
जव्हार : पालघर जिल्हातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि पर्यटन स्थळ व एैतिहासीक वारसा लाभलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडीची लहर सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासुन जव्हार शहरात सायंकाळच्या वेळेस थंडी जोर पकडत आहे.
जव्हार तालूका हा घनदाट जंगल-दऱ्याखोऱ्यातील, अतिदुर्ग भाग असल्यामुळे येथे थंडी चांगलीच जाणवते. त्यामुळे येथील व्यापारी बंधुंनी तसेच फेरीवाल्यांनी थेट लुधियाना शहरातून लोकरीचे, रेग्जीनचे स्वेटर, शाल, कंबल, मफलर, कानटोपी, माकडटोपी इत्यादी व्हराईटीचे उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी आनले आहेत. तसेच काही फेरीवाल्यांनी आपले दुकान चक्क रस्त्यांवर मांडून व्यवसाय करीत आहेत.
ग्रामीण आदिवासी भाग असल्यामुळे या फुटपाथवरील दुकानांवर खरेदीकरीता खेडोपाड्यातील बांधवांची गर्दी दिसुन येते.
जव्हार शहरातील भाग शाळेसमोर, मेमन मार्केट, व एस. टी. स्टॅन्ड रोडवरील व्यापाऱ्यांकडे आप आपल्या सोयीनुसार लहान मोठे स्वेटर, कोट, शाल, मफलर खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. यावर्षी व्यापारी वर्गाने वेगवेगळे लोकरीने विणलेले चमकदार, दर्जेदार लेडीज-जेन्टस् स्वेटरचे प्रकार बाजारात विक्रीसाठी आणलेले आहेत. यात लहान मुलांचे-मुलींचे स्वेटर रू. ७०/- ते ७००/- पर्यत तर मोठे मुला-मुलींचे स्वेटर रू. १६५/- ते ९६०/- रूपयांपर्यत तसेच लेदर मधील कोट हे लहान व मोठे रू. १८५/- ते १०००/- पर्यत बाजारात उपलब्ध आहेत. रात्रीच्या वेळेस लोक घराबाहेर छोटी मोठी शेकोटी करताना दिसत आहेत. आजू बाजूला पडलेल्या सुक्या फाट्या, गवत, गोणपाट इत्यादी वस्तूचे वापर करून शेकोटी करतांना लोक दिसत आहेत.