Gudi Padwa 2018 : निमित्त गुढीपाडव्याचे, जल्लोष संस्कृतीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:07 AM2018-03-19T03:07:24+5:302018-03-19T03:07:24+5:30
अथांग स्नेहाचा आणि नातेसंबंधांच्या जपवणुकीचा ^‘गुढी पाडवा’ सण साजरा करण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील तरुणाई परंपरागत पेहरावात रस्त्यावर उतरली.
पालघर : अथांग स्नेहाचा आणि नातेसंबंधांच्या जपवणुकीचा ^‘गुढी पाडवा’ सण साजरा करण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील तरुणाई परंपरागत पेहरावात रस्त्यावर उतरली. ढाल-ताश्याच्या गजरात, भगवे ध्वज हाती घेऊन गावागावात काढण्यात आलेल्या शोभा यात्रे मध्ये सहभागी झालेल्याचे स्वागत रस्त्यावर रांगोळी काढून करण्यात आले.
संस्कार भारती, पालघर च्या सौजन्याने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळी ‘सूर पहाटेचे’ ह्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. गायिका वैदेही मुळीक व शिष्यगणाने भल्या पहाटे आपल्या सुमधुर संगीताने वातावरण भारले. सकाळी ७.१५ वाजता हुतात्मा स्मारका पासून शहरातील मुख्य रस्त्यावर स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शोभा यात्रेत पारंपरिक वेष परिधान करून ढोल ताश्याच्या, तारपाच्या गजरात महिलांनी फेर धरला.
>जव्हारच्या शोभायात्रेचे नेतृत्व महिला आघाडीकडे
जव्हार : चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदे निमित्त शहरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सव स्थळ अर्थात श्रीराम मंदिर येथून महिलांच्या नेतृत्वाखाली या स्वागत यात्रेला सुरुवात झाली. अनेक सांस्कृतीक गीते तसेच पारंपारिक वाद्यांच्या साथीने वातावरण चांगलेच भारले होते. सकाळी दहाच्या सुमारास पारंपारिक वेश परिधान केलेल्या अबालवद्धांनी रॅलीद्वारे अनेक मेसेज दिले.
दरवर्षी शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त रॅलीचे आयोजन होते मात्र, यंदा महिलांनी सहभाग घेऊन प्रभात फेरीची शोभा वाढवली. नऊवारी, नथी, चंद्रकोर आणि मराठमोळे फेट्यांमुळे जणु मराठेशाहीच अवतरल्याचा भास होत होता. स्वागत यात्र समितीचा पदभार हा महिला मंडळाकडे देण्यात आल्याने महिलांनी स्वागत यात्रेची जय्यत तयारी केली होती. शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटना, महिला मंडळ, मंदिर ट्रस्ट यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्यÞा संख्येने यात सहभाग नोंदविला. यात्रेमध्ये झालेल्या गर्दीत महिलांचा उत्साह हा सर्वाचे आकर्षन ठरले होते. सर्वाधिक गर्दी ही केवळ महिलांचीच झाली होती. शिस्तबध्द आणि उत्साहात घोषणा देत ही फेरी गावात फिरली. दिपाली महाले, ऋतुजा करमरकर, निधी शिरसाठ, झिनल पटेल, देवयानी वाघ, वृषाली चोथे यांनी विशेष मेहनत घेऊन ही शोभायात्रा यशस्वी केली.
>विकमगड शहरात प्रबोधनपर शोभायात्रा
विक्रमगड : गुढीपाडव्या निमित्त शहरात पांरपारीक संस्कृती व प्रबोधनपर शोभायात्रा काढण्यात आली. यात नाणिजच्या नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आध्यात्मिक प्रबोधन व संस्कृती दर्शन घडविले. गेली सोळा वर्षे संस्कृती संवर्धन मंडळ हे काम करीत आहे.
>गुढीपाडव्यानिमित्त तलासरीत शोभायात्रा
तलासरी : तलासरी नाक्यावरील चारानीया टॉवर येथून नगराध्यक्ष स्मिता वळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभयात्रेला सुरु वात झाली. शोभायात्रा तलासरी नाक्यावरून गावात, बाजार पेठेतून निघून श्रीराम मंदिरात तिची सांगता झाली. तारपानृत्य प्रमुख आकर्षण ठरले.
>तारापूरला शोभायात्रेचे आयोजन
बोईसर : गुढीपाडपाडव्या निमित्त रविवारी सकाळी तारापूर गावात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सुतार आळीपासून ते श्रीराम मंदिर, श्री तारकेश्वर मंदिर मार्गे जनाबाई सभागृह पर्यंत काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत नागरिक व महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
>गुढ्या, तोरणे अन् रांगोळ्यांची रेलचेल
पारोळ : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा वसई पूर्व व पश्चिम भागात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. येथील संस्कृतीप्रमी नागरिकांनी सकाळ पासूनच नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी आप आपला परिसर झाडून स्वच्छ केला होता. रस्ते गुढ्या, तोरणे, पताका व रांगोळ्यांनी सजवले होते. परिसरात जवळपास प्रत्येकाने आपल्या दारासमोर, खिडक्यांवर, ग्यालरीमध्ये गुढ्या उभारल्या होत्या. घराघरात गोड धोड पदार्थ ताटात वाढले जात होतेच. मात्र, पाडव्याच्या मराठ मोळ्या श्रीखंड पुरी प्रमाणे वसई भागात आजच्या दिवशी स्नानानंतर कडुनिंबाचा रस प्रत्येक घरोघरी पिण्यात आला. कडूनिंबाच्या आरोग्यासाठीच्या महत्वा बरोबरच पाडव्याच्या दिवशी शंभूराजांचा झालेला मृत्यू लक्षात राहवा म्हणून देखील महाराष्टÑामध्ये ही परंपरा जोपासली जाते असा एक विचार प्रवाह आहे.