गुंदलेचा धोकादायक खड्डा त्वरित बुजविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 03:17 AM2017-08-14T03:17:21+5:302017-08-14T03:17:21+5:30
गुंदले गावाजवळच्या फर्निचर मार्केट समोरील रस्त्याच्या कडेची माती वाहून पडलेल्या धोकादायक खड्डयाचे छायाचित्रासह वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच तो तातडीने बुजविण्यात आला
पंकज राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर एमआईडीसी ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महमार्गावरील गुंदले गावाजवळच्या फर्निचर मार्केट समोरील रस्त्याच्या कडेची माती वाहून पडलेल्या धोकादायक खड्डयाचे छायाचित्रासह वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच तो तातडीने बुजविण्यात आला आहे.
पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून गेल्याने त्या कडेचा रस्ता (साईड पट्टी) आतिल बाजूने पूर्णपणे पोखरल्याने खचण्याच्या मार्गावर होती भर पावसात वाहन चालकास खचलेला रस्ता न दिसल्यास वाहन कलंडून अपघाताची शक्यता हे वृत्त ११ आॅगस्टच्या लोकमत मध्ये प्रसिद्ध झाले होते.
या रस्त्यावरुन तारापूर एमआईडीसी कडे दिवस रात्र वाहतूक सुरु असते गुंदले गावाच्या अलिकडील वडाच्या झाडालगतच्या डांबरी रस्त्याची माती आतून वाहून गेलेली होती जोराच्या पाऊसात त्या खड्यातून प्रचंड वेगात पाणी वाहत असे त्यामुळे हा खड्डा चालकाच्या नजरेस येत नव्हता त्यामुळे अपघाता बरोबरच जीवितहानी होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत होते .
लोकमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच धोकादायक खड्यामध्ये मातीचा भराव टाकून तो खड्डा बुजविण्यात आला त्यामुळे संभाव्य अपघात व जीवित हानी टाळली गेली आहे.
-अविनाश पाटील, ग्रामस्थ, गुंदले