हाती आला टॅब अन विद्यार्थ्यांचा वाढला रुबाब
By Admin | Published: January 10, 2017 05:40 AM2017-01-10T05:40:27+5:302017-01-10T05:40:27+5:30
धुनिक शिक्षणाची कास धरून व तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकून सोनारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने डोल्हारा केंद्रातील पहिली डिजिटल
मोखाडा: आधुनिक शिक्षणाची कास धरून व तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकून सोनारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने डोल्हारा केंद्रातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा मान मिळविला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हातातील पेन, वही कालबाह्य होणार असून त्याजागी टॅब येणार आहेत.
सोनारवाडी शाळेतील शिक्षकांनी पदरमोड करून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ही शाळा डिजिटल केली असून त्यासाठी धामणशेत ग्रामपंचायतीने प्रोजेक्टर दिला
आहे. त्याचे उदघाटन सरपंच मयुरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग होईल असे, मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राम बरफ, लक्ष्मण नांदे, शालेय व्यवस्थापन समितीचे भाऊराव दोधाड, केंद्र प्रमुख नामदेव शिंदे, भरत गारे वसंत ढोंग, विलास गिरधले उपस्थित होते. डिजिटल शाळा उभारल्याने मुख्यधापक नारायण डावखरे आणि शिक्षक रमेश धूम यांचे अभिनंदन करण्यात आले. (वार्ताहर)