बोईसरला २०१ जोडप्यांचे शुभमंगल; लगनगड्यांची वेठबिगारी काढली मोडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:59 AM2018-06-04T02:59:28+5:302018-06-04T02:59:28+5:30
आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा व श्रमीक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत येथील आदिवासी समाजातील गरीब व आर्थिक दृष्टया इतर मागासवर्गीय २०१ जोडप्यांनचा सामुदायिक विवाह सोहळा मोठया धूम धडाक्यात संपन्न झाला.
बोईसर : आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा व श्रमीक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत येथील आदिवासी समाजातील गरीब व आर्थिक दृष्टया इतर मागासवर्गीय २०१ जोडप्यांनचा सामुदायिक विवाह सोहळा मोठया धूम धडाक्यात संपन्न झाला.
तारापूर एमआयडीसीतील टीमा ग्राऊंडवर आयोजिलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला पालघर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या सह आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंग, सचिव जगदिश धोडी, आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच बरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या गावातील वºहाडी मोठया प्रमाणात या सोहळ्यात सहभागी झाले होते.
प्रतिष्ठान मार्फत आता पर्यंत सुमारे अडीच हजार आदिवासी जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखालील गरजूंच्या विवाहासाठी प्रतिष्ठान पुढाकार घेत असते. विवाहाबरोबरच संसारास लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येते. कर्ज घेऊन लग्न केल्या नंतर ते कर्ज फेडण्यासाठी वर्षोनुवर्षे लागून कायम कर्ज बाजारी राहावे लागत असल्याने हा उपक्रम संस्थेने सुरु केल्याने जगदीश धोडी यांनी सांगितले.