गावाचा सुपुत्र खासदार झाल्याचा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:55 AM2018-06-01T05:55:25+5:302018-06-01T05:55:25+5:30
येथील जिल्हा परिषद व खासदारकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने
मनोज शेलार
नंदुरबार : येथील जिल्हा परिषद व खासदारकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने आणि राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता कमी असल्याने पालघर गाठून तेथे व्यवसाय सुरू करणारे व नंतर राजकारणात गेलेले राजेंद्र धेड्या गावित यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या विजयाचा त्यांचे मूळ गाव असलेल्या उमज (ता. नंदुरबार) येथे आनंदोत्सव साजरा झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. १९९२ ते ९६ या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबारमध्ये लोकप्रतिनिधी बनण्यासाठीही संधी नसल्याचे पाहून त्यांनी पालघर येथे गॅस एजन्सी सुरू केली. तेथे त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून काम सुरू केले. २००६मध्ये त्यांना पालघर पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली, ते निसटत्या मतांनी पराभूत झाले. नंतर ते काँग्रेसकडून विजयी झाले.
राजेंद्र हा नेहमीच महत्त्वाकांक्षी राहिला आहे. त्याचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. उमजसारख्या छोट्याशा आदिवासी गावाचे नाव त्याने देशात पोहोचविले, याचे समाधान आहे.
- दत्तू गावित, मोठे बंधू