सागरी महामार्गाच्या विरोधात एकजूट, शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:02 AM2018-02-03T06:02:36+5:302018-02-03T06:03:20+5:30
सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.
- हितेन नाईक
पालघर - सुमारे १० वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित सागरी महामार्गाला आता नव्याने पुनरु जिवीत करण्याचा प्रयत्न शासन पातळीवरून केला जात असताना ज्या शेतक-यांच्या जमिनी ह्या मार्गात जातात त्यांना विचारायचे साधे सौजन्यही प्रशासन पाळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकºयानी जिल्हाधिका-यांची भेट घेत आपला रोष व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परनाली- मोरेकुरण-आगवन-दापोली असा सुमारे ९ किमी आणि २५ कोटींचा सागरी महामार्ग सन २००७-०८ च्या सुमारास बांधावयास घेण्यात आला होता. समुद्राशी काडी मात्र संबंध नसलेल्या ह्या सागरी महामार्गाची उभारणीच चुकीच्या आधारे झाल्यानंतर अनेक वर्षांपासून तो व दुधखाडीवर उभारलेल्या पुलाचे काम बंद होते.
झाई-बोर्डी-दापोली-रेवस-रेड्डी असा कोकणपर्यंत जाणाºया ह्या सागरी महामार्गाच्या रस्त्याच्या अपूर्णावस्थेतील कामे पूर्णत्वास नेण्याबाबत इथला लोकप्रतिनिधी उदासीन होता. जिल्हा निर्मिती नंतर पुन्हा ह्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाला सुरु वात करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने बाधित शेतकºयांनी जिल्हाधिकाºयकडे हरकती नोंदवून तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शेतकºयांशी चर्चा करण्याची इच्छा जिल्हाधिका ºयांनी व्यक्त करून त्यांना गुरु वारी चर्चेला बोलाविले होते. शेतकºयांना विश्वासात न घेता निवीदा प्रकीया काढली गेल्याने संबंधीत महामार्गातील बाधित शेतकरी हे संतप्त झाले असून प्रथम आमच्या जमिनीचा मोबदला द्या नंतरच कामाला सुरु वात करा. अन्यथा या विरोधात सरकारशी दोन हात करण्याच्या आम्ही तयार आहोत असा इशारा उपस्थित निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला.
सरकारच्या दडपशाहीचा केला निषेध
हा सागरी महामार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला असून अनेक शेतकºयांच्या जमिनीत चुकीच्या पद्धतीने वृक्ष तोड करून, मातीचा भराव केल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोरेकुरण, दापोली, आंबेडकर नगर, कुंभवली गावातील प्रभावित शेतकºयांनी सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध करून आंदोलने केली असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता, प्रशासनाचे धोरण हे शेतकºयांना पूरक व त्यांना संपूर्ण विश्वासात घेऊनचं आखण्यात येईल. असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
रस्त्याच्या निवीदा तातडीने थांबवण्याचे आदेश देऊन, उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सा. बां. वि. चे कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकारी, यांना सागरी महामार्गा बाबतचे धोरण शेतकºयांना विश्वासात घेऊनच निश्चित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाºयांना दिल्याचे कुंदन संखे यांनी सांगितले.
यावेळी सुनिल राऊत, तसेच गणेश पिंपळे, प्रल्हाद संखे, रु पेश संखे, निलीम संखे, सुधाकर संखे, ललित संखे, दशरथ संखे,आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाºयांना परिस्थितीचे वास्तव पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.