हातोबा देवस्थानाला हवे पर्यटन खात्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:28 AM2019-02-23T01:28:30+5:302019-02-23T01:28:52+5:30

संस्थानकाळाचा वारसा लाभलेले मलवाडा गाव : पिंजाळ नदी, निसर्ग सौर्द्य अन् निरव शांतता

Hathoba Devasthanan should be strengthened by the tourism department | हातोबा देवस्थानाला हवे पर्यटन खात्याचे बळ

हातोबा देवस्थानाला हवे पर्यटन खात्याचे बळ

googlenewsNext

राहुल वाडेकर

विक्र मगड : जव्हार संस्थानिकांचा वारसा लाभलेले वाडा व विक्र मगड तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेले पिंजाळ नदी काठावरील निसर्गाच्या कुषीत वसलेले हातोबा देवस्थान जिल्हयातील ऐतिहासिक देवस्थान म्हणन परिचित आहे. बारमाही भरपूर पाणी असलेली पिंजाळ नदी, हवेत नेहमी असणारा गारवा, नदीच्या दोन्ही बाजूस असलेले फार्महाऊस व वाड्या, चोहीकडे हिरवाईने नटलेला परीसर यामुळे या देवस्थानाकडे वर्षभर पर्यटक व भाविकांची वर्दळ असते.

वाडा, विक्र मगड व जव्हार या तालुक्यातील भक्तांचा येथे नेहमी राबता असतो. हातोबा देवाला बोललेला नवस पुर्ण होत असल्याचे गावकरी मोठ्या श्रद्धेने सांगताना देवस्थाना समोर लाकडी हात, पाय, नाक, डोके, कान. पाळणा यांचा खच दाखवतात. भाविकांनी केलेल्या नवसानुुरुप देवाला वरिल साहित्य वाहण्याची परंपरा येथे आहे.
आधुनिक काळातही आलेल्या संकटापुढे गुढगे टेकलेल्या अनेक व्यक्ती येथे येतात व आपल्या झाळीत समाधान घेवून जातात असे येथील पुजारी यांचे म्हणणे आहे. देवस्थानाला लागूनच पिंजाळ नदीचा डोह आहे. त्यात आंघोळीचा व पोहण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांना घेता येतो. तसेच नदीतून होडयांची व लाकडी ताफयांची सफर करण्याची पर्वनी देखील पर्यटकांना मिळते. नदीचा किनारा व घनदाट जंगल असल्यामुळे मोर, ससे, कोल्हे, तरस व रानडुक्कर यांच्यासह विविध पक्षांचे अधून मधून दर्शन होत असते. जवळ असणाऱ्यां मलवाडा गावात १२५ वर्षांची जूनी इमारत व तिच्यावरील नक्षीकाम, गावंदेवी व हनुमान मंदीर त्याचप्रमाणे परीसरातील एकमेव शनि मंदीराचा शेजार हातोबा देवस्थानाला आहे.

सोयींची वानवा
प्रसिद्ध देवस्थान, निसर्ग रम्य परिसर असलेल्या या स्थानाकडे अजूनही शासनाचे दुर्लक्ष आहे. या देवस्थानाला येणाºया भाविकांसाठी दोन समाजगृह आहेत. मात्र त्यांची अवस्था दयनीय असून पत्रे, लादया, दरवाजे, खिडक्या पूर्णत: निखळलेल्या आहेत. येथे येणाºया भाविकांना पावसाळयात प्रचंड त्रास होता. स्वच्छता गृहाचा अभाव, विजेची गैरसोय असून शंभर एकर जमिन पडीक आहे.

कसे जाल : हातोबा देवस्थानापासून ठाणे ७० कि.मी. अंतरावर असून वाडा १० कि.मी. तर जव्हार २७ कि.मी. आहे. मुंबईहुन पश्चिम रेल्वेने यायचे झाल्यास पालघर रेल्व स्टेशन ला उतरून किंवा ठाण्याहुन विक्रमगड पर्यंत यावे. यासाठी पालघर व ठाणे एसटी स्थानकातून गाड्या उपलब्ध आहेत. विक्रमगडहुन १२ किमीवर असणाºया मलवाडा येथे वडाप द्वारे किंवा खाजगी वाहनाने याव

आम्ही वर्षातून अनेक वेळा हातोबा देवस्थानाला भेट देत असतो मात्र याठिकाणी असणाºयां असुविधांमुळे आम्हाला खूप त्रास होता. शासनाने या देवस्थानाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरजेचे आहे.
- अनिकेत सांबरे, (पर्यटक)

आमदार पांडुरंग बरोरा याचा निधीतून या पर्यटन विकासासाठी काही निधी मंजूर झाला आहे. परंतु तो अपुरा आहे. या साठी ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषणा करावी.
- चेतन कोरे, सामाजिक कार्यकर्ता
 

 

Web Title: Hathoba Devasthanan should be strengthened by the tourism department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.