उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:44 AM2017-08-27T01:44:42+5:302017-08-27T01:44:45+5:30

उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली.

He allegedly got angry over the Rs 500-odd money that he and his friend had murdered | उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी केला मित्राचा खून

उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी केला मित्राचा खून

Next

विरार : उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली.
करण कनोजिया (३५) हा सातीवली येथील कुवारपाडा येथील रहिवाशी होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या घरातून कुजलेला वास येत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी करणचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक डी. बी. बांदेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायकर, उपनिरीक्षक विनायक माने, सतीश चव्हाण, उपनिरीक्षक खडतरे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, रवी पवार, चौघुले. जाधव, नवले यांची पथके तयार केली होती. खून केल्यानंतर आरोपींनी कोणताच पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे खबºयांमार्फत माग काढून पोलीसांनी अवघ्या आठ तासात भोला उर्फ रघुनाथ यादव, आणि मलिंगा उर्फ फुलचंदकुमार प्रजापती यांना अटक केली.

वाद विकोपाला गेला
करणने दोघांकडून पाचशे रुपये उसने घेतले होते. त्यावरून वाद झाला होता. २२ आॅगस्टला रात्री तो वाद विकोपाला गेला होता. चिडलेल्या भोला आणि मलिंगाने करणचे डोके भिंतीवर आपटून त्याला जबर मारहाण केली. नंतर जमिनीवर पाडून त्याच्यावर सुरीने वार करण्यात आले. तो मरण पावताच घराला कुलूप लावून दोघेही पसार झाले होते.

Web Title: He allegedly got angry over the Rs 500-odd money that he and his friend had murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.