परीक्षार्थ्यांना तो देतोय मोफत सेवा, सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:20 AM2019-02-23T01:20:02+5:302019-02-23T01:20:24+5:30

विरारमधील रिक्षाचालकाचा उपक्र म : सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

He offers the testers the free service, the charitable attitude everywhere | परीक्षार्थ्यांना तो देतोय मोफत सेवा, सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

परीक्षार्थ्यांना तो देतोय मोफत सेवा, सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

Next

वसई : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून अभ्यासाच्या टेन्शन सोबत पेपरला वेळते पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी कसरत होत आहे. वेळेत पोहचण्यासंबधी यंदाही बोर्डाचे नियम कडक असताना विद्यार्थ्यांचा वाहतुक कोंडीत वेळ जावू नये म्हणुन विरार येथील समीर चव्हाण या सेवाभावी रिक्षावाल्याकडून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.

हे सहकार्य म्हणजे देशसेवेचे कर्तव्यच असल्याचे सांगत त्याने ही सेवा मोफत ठेवली आहे. दरम्यान विद्यार्थी वाहतुक कोंडीत कोठेही अडकल्यास या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ७०३८११५८६३ या मोबाईल क्र मांकावर फोन करावा असे आवाहन त्याने केले आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथे तो आपल्या कुटुंबासह राहतातो. पूर्व भागात मागील दहा वर्षांपासून ते रिक्षा व्यवसाय करत आहेत. रोज पहाटे ३ वाजल्या पासून सकाळी ८ वाजेपर्यंत रिक्षा चालवतात व त्यानंतर वसईतील एका खाजगी कंपनीत ते नोकरी करतात. त्यांनी हा दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीसाठी मोफत रिक्षा सेवेचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी परीक्षेच्या वेळेत रिक्षा चालविण्याची परवानगी चव्हाण यांनी सातीवली येथील काम करत असलेल्या कंपनीतून घेतली आहे. या सेवाभावी उपक्रमामुळे त्याचे कौतुक होत आहे. मुलांसाठी मोफत सेवा देऊन एक चांगले काम करत असल्याची पोच नागरिकांमधून त्याला मिळत आहे. गुरु वारी पहील्याच पेपरला सात विद्यार्थ्यांनी फोन करु न ही सेवा अनुभवली. या सातही जणांना परीक्षा केंद्रावर वेळेत सोडण्यात आले. या उपक्र माची माहिती वाहतुक पोलीसांनाही देण्यात आली असल्याने पोलीस खात्याकडूनही त्याची स्तुती होत आहे.

माझे शिक्षण गावी झाले, तेव्हा शाळेत परीक्षेसाठी जाण्यासाठी ७ ते ८ किलोमीटर चालत पायपीट करावे लागत असे, तसेच अजूनही बोर्डाचे सेंटर वेळेत गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होते. ती लक्षात घेऊनच ही मोफत सेवा देणे हे या मागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- समीर चव्हाण,
रिक्षा चालक

Web Title: He offers the testers the free service, the charitable attitude everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.