Shraddha Walker Case : श्रद्धा वालकरचे निवेदन सोशल मीडियावर व्हायरल, आपले तुकडे करणार असल्याचे तक्रारीत आहे नमूद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:30 PM2022-11-23T17:30:57+5:302022-11-23T17:34:54+5:30
श्रद्धा हत्याकांडात देशभरात संताप व्यक्त होत असताना तसेच रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
मंगेश कराळे
नालासोपारा : श्रद्धा हत्याकांडात देशभरात संताप व्यक्त होत असताना तसेच रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तिने लिहलेली पोलीस तक्रारीची प्रत बुधवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने या संतापात आणखी भर पडली आहे.
लोकांच्या दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येऊ लागल्याने पोलीस प्रशासनाच्या विरोधातही जनप्रक्षोभ उसळला. नोव्हेंबर २०२० मध्ये तुळीज पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीमधे आफताब आपणास सहा महिन्यापासून मारहाण करत असून तो आपले शरीराचे तुकडे करून फेकून देईल अशी धमकी दिली असल्याचे नमूद आहे. महत्त्वाचे म्हणजे आफताब आपल्याला ब्लॅकमेल करीत आहे. ब्लॅकमेल कशाच्या आधारे केले जात आहे याचा उल्लेख नाही त्यामुळे पोलिसांनी या बाबीवर तपास करणे आवश्यक होते. आज स्थितीतही दिल्ली पोलिसांनी यावर तपास करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या पत्रानुसार, आफताब मारहाण करीत असल्याची तसेच ठार मारणार असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आहे. ही अजून धक्कादायक बाब उघड झाली आहे. "आज त्याने मला गुदमरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला ठार करेल आणि जागोजागी कापून फेकून देईन." असा स्पष्ट उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. तब्बल २ वर्षांनी तिची ही शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली? त्यांनी योग्य कारवाई केली असती तर तिचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहेत.
सदर बाबत अधिक माहिती संकलित केली असता, नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला आफताबने एव्हरशाईन वसई येथे राहत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिला तुळींज पोलीस ठाण्यात मित्र घेऊन गेला होता. तुळींज पोलिसांनी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण तिने याकडे कानाडोळा केला. परंतु ती मेडिकल साठी गेलीच नाही. ती मेडिकल करण्यासाठी का गेली नाही? कोणत्या कारणामुळे तिने माघार घेतली हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तेव्हा तिने मेडिकल व गुन्हा दाखल केला असता तर आज श्रद्धा जीवंत असती असे तिचा मित्र राहुल राय याने सांगितले आहे. आफताबने तिला अनेक वेळा मारहाण केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर श्रद्धाचे पत्र व्हायरल होत आहे याबाबत आपण काही सांगू शकत नाही. तिच्या तक्रारीवर चौकशी तुळींज पोलिसानी केलेली आहे. चौकशी दरम्यान आपली कोणतीही तक्रार नसून मी दिलेली तक्रार मागे घेत आहे. असे स्टेटमेंट पोलीस ठाण्यात दिले होते.
सुहास बावचे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)