आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:14 AM2018-08-20T03:14:14+5:302018-08-20T03:14:36+5:30
रुग्णसेवेच्या तोकड्या व्यवस्थेमुळे गुजरातचा आधार
- हितेन नाईक
पालघर : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातपाटी मधील मागील ९ वर्षांपासून काम सुरू असलेले आणि सुमारे १ कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या धूळ खात पडून आहे. त्यामुळे गावातील गरीब रु ग्णांना उपचारासाठी नाईलाजाने गुजरात अथवा सिल्वासा येथील रु ग्णालयात जायची नामुष्की ओढवत आहे.
सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ठाणे जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १९८० साली बांधण्यात आली होती. ३० वर्षाच्या वापरा नंतर सदर इमारत जीर्ण झाल्याने इमारतीच्या छपराचे प्लास्टर, सज्जे धडाधड खाली कोसळू लागले होते. त्यामुळे रुग्ण आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने जून २००९ साली’ सातपाटी आरोग्य केंद्रच आजारी अश्या आशयाचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ठाणे जिल्हापरिषदेचे तत्कालीन आरोग्य सभापती पांडुरंग पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट देत नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. मात्र, ठाणे जि.प. मधील बांधकाम विभागातील अभियंत्यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविण्या ऐवजी ६ लाख ५० हजाराचा निधी डागडुजीसाठी मंजूर करु न घेतला.
डागडुजीच्या कामाला सुरु वात झाल्या नंतर नवीन काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर काही दिवसातच नवीन बांधकाम कोसळले. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया जात रुग्णांच्या जीवितहानीस जबाबदार कोण? असा प्रश्न पुन्हा वृत्ताद्वारे उपस्थित केल्या नंतर तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी सर्व पाहणी करून निधी रद्द करण्यास लावला. जिल्हा नियोजन सभेत हा प्रश्न लावून धरीत सुमारे १ कोटी ६ लाखाचा निधी मंजूर करून घेतला आणि त्याचे भूमिपूजन त्यांनी केले होते. त्या भूमीपूजनाला आज ९ वर्षाच्या कालावधी लोटला असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही सुरू झालेले नाही.
नवीन प्रा. आ. केंद्र मंजूर झाल्यानंतर जुने पाडून त्याठिकाणी नवीन इमारतीचे काम सुरू व्हायलाच दोन वर्षाचा कालावधी लागला. अनेक अडचणींवर मात करीत शेवटी २०१० मध्ये सुरू झालेल्या या इमारतीचे काम पूर्ण करण्यास ठेकेदारांच्या पुढे अनेक अडचणी निर्माण होत गेल्या. आज मागील एक ते दीड वर्षांपासून इमारतीचे काम पूर्ण झाले असून पाण्याची टाकी आणि बोअर दुरु स्तीच्या कामासाठी पंचायत
समितीच्या पाणी पुरवठा विभागाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागावा यातच प्रशासनाची उदासीनता दिसून येते.
या बाबत सातपाटीतील काही जागृत ग्रामस्थांनी बीडीओ डॉ.घोरपडे यांची ११ जून रोजी भेट घेतल्यानंतर हे काम ठेकेदाराने तात्काळ सुरू केले. मात्र ३ महिन्याचा कालावधी व्हायला आल्यानंतरही हे काम आजही पूर्ण होत नसल्याने रुग्णालयाचे कामकाज सुरू होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळाल्या शिवाय आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू करू शकत नसल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बारा गावांची रुग्णसेवा सरकारी शाळेतून
सातपाटी आरोग्य केंद्राशी सातपाटी १, सातपाटी २, शिरगाव, खारेकुरण, मोरेकुरण, आदी एकूण बारा गावांशी जोडण्यात आले असून असंवेदनशील अधिकाºयांमुळे मागील आठ वर्षांपासून लहान बालके, गरोदर स्त्रिया, वृद्ध रु ग्ण यांची उपचाराबाबत ससेहोलपट सुरू आहे. सध्या सातपाटीचे प्रा.आ.केंद्र गत नऊ वर्षांपासून एका जुन्या शाळेत सुरु आहे.
डॉक्टर वेळेवर न येणे, रात्रीच्यावेळी आरोग्य केंद्रात उपस्थित नसणे आदी रु ग्णांच्या अनेक तक्र ारी असून १ लाख रु ग्णांची भिस्त असलेल्या रु ग्णालयाची सुंदर इमारत बांधून तय्यार असतानाही तिचे कामकाज सुरु झालेले नाही. आरोग्य सेवे सारख्या महत्वपूर्ण सेवे बाबतच्या उदासीनतेचा फटका सातपाटीसह अन्य बारा गावातील गरजू रुग्णांना बसत आहे.
तारीख पे तारीख : रुग्णांच्या उपचारासाठी मागील दोन वर्षांपासून उभी असलेली सातपाटी प्राथमिक रु ग्णालयाची इमारत. जून २०१० साली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर तत्कालीन आमदार राजेंद्र गावित यांनी प्रा.आ.केंद्राला भेट देत पाहणी केली होती.