फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:24 AM2018-08-19T03:24:01+5:302018-08-19T03:24:18+5:30
फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत
पालघर : विरेंद्रनगर मधील फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे कंपनी मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे पदाधिकारी सुरज धोत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
पालघरच्या पूर्वेकडील झोराबियन इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स प्लॉट क्र मांक १४, १५, १६ स्थित फ्रिडन फार्मासिटीकल लिमिटेड ही कंपनी येथे औषधांचे उत्पादन करीत आहे. उत्पादनावर प्रक्रिया करून निघणारे रसायनयुक्त रंगमिश्रित दूषित पाणी नजीकच्या नाल्यात छुप्या पद्धतीने सोडले जात आहे. यामुळे हा नैसिर्गक नाला दुषित झाला असून त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. हे प्रदूषित पाणी परिसरातील शेतकºयांच्या शेतात जात असून गायी, म्हशी आदी जनावरे हे पाणी पीत असल्यामुळे त्यांना पोटफुगीचा त्रास सुरु झाला आहे.
नाल्या नजीक गोविंद धोडी यांची शेती असून त्यातून भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे नाल्यातील प्रदूषित पाणी धोडी यांच्या शेतात साचल्याने त्यांचा भाजीपाला कुजला आहे. शेतीवर चालणारा त्याचा उदरनिर्वाह या प्रदुषणामुळे अडचणीत आला आहे. कंपनीवर थातुरमातुर कारवाई केली असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. या कारवाई नंतर पुन्हा कंपनी कडून सतत प्रदूषित पाणी सोडले जात असून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्थानिकांच्या आरोग्याशी, जीविताशी, खेळणाºया कंपनी मालकावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी लेखी मागणी धोत्रे यांनी केली आहे.
ही कंपनी छुप्या पद्धतीने रासायनीक व रंगमिश्रित प्रदूषित पाणी या नाल्यात वारंवार सोडत असल्याची तक्र ार या पूर्वीही करण्यात आली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूरच्या अधिकाºयांनी कारवाई करण्याचे आश्वासन देऊन येथील तक्र ारदाराची बोळवण केली असल्याचा आरोप केला जात आहे. या कंपनीचा विद्युत पुरवठा खंडित करून त्यांचे उत्पादन तात्काळ थांबविण्याचे गरज असताना थातुरमातुर कारवाई केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.