आरोग्य उपकेंद्रच मरणपंथाला

By admin | Published: January 12, 2017 05:50 AM2017-01-12T05:50:06+5:302017-01-12T05:50:06+5:30

आरोग्यासाठी बनवलेल्या नंडोरे येथील आरोग्य उपकेंद्राची असूनही नसल्यासारखी गत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात

Health subsection dies | आरोग्य उपकेंद्रच मरणपंथाला

आरोग्य उपकेंद्रच मरणपंथाला

Next

निखिल मेस्त्री / नंडोरे
आरोग्यासाठी बनवलेल्या नंडोरे येथील आरोग्य उपकेंद्राची असूनही नसल्यासारखी गत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदने २००७ साली ५ लाख ७२ हजार ३४४ रुपये खर्च करून या वास्तूची उभारणी केली. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नंडोरे-देवखोप ग्रामपंचायतीत व ग्रामपंचयातीसमोर असलेले हे उपकेंद्र जेव्हा पहावे तेव्हा बंदच असल्याचे गावकाऱ्यांचे म्हणणे असून आरोग्य सेवा घेण्यासाठी आलेल्या येथील लोकांना खाजगी दवाखान्याची वाट धरावी लागते आहे. या परिसरापासून मासवण व पालघरचे प्राथमिक आरोग्य केंद्र दूर आहे. गावातच शासकीय सेवा असूनही खाजगी दवाखान्यात जाणे येथील लोकांना परवडत नाही तरीही पदरमोड करून प्रवासभाडे करून तेथे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही व यामुळे येथील गावकाऱ्यांची ससेहोलपाट होते आहे.
भव्य जागेत कुंपण बंदिस्त व सुंदर असे बांधलेले हे आरोग्य उपकेंद्र फक्त दिसण्यापूरतेच सुंदर आहे. तेथे जर आरोग्य सुविधाच मिळत नसतील तर हे आरोग्य उपकेंद्र सुंदर असण्याचा काय फायदा व लक्षावधी रुपये खर्चून लोकसेवेसाठी बांधलेले व लोकार्पण झालेले हे उपकेंद्र बंद राहत असेल तर शासनाने या उपकेंद्रासाठी एवढा खर्च कशासाठी करावा असा प्रश्न आहे. या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका नाही. उपकेंद्रात कायमस्वरूपी निवासी आरोग्यसेविका गरजेचे असतांना व त्या उपकेंद्रातच राहणे अपेक्षित असतांना फिरतीचा कार्यक्र म लावून त्या आठवडाभर त्यांचा कामानिमित्त अन्यत्र फिरत असतात. त्या पाड्यावर किंवा अन्य ठिकाणी फिरतीवर गेल्या की हे उपकेंद्र बंदच राहते. उपकेंद्राबाहेरील पाटीवर सिस्टर अमूक ठिकाणी गेल्या आहेत असे खडूने लिहिलेली पाटी दिसते व केंद्राला ठोकलेले टाळे ही दिसते. असे महिन्यातून बऱ्याचदा होते व अशा वेळेस रु ग्ण येथे उपचारार्थ आला असता त्याची निराशा होते व न परवडणाऱ्या खाजगी दवाखान्याची वाट त्याला धारावी लागते. या उपकेंद्रातील आरोग्यसेविका कामानिमित्त बाहेर जात असतील तर इथे आरोग्यसेविकेचे आणखीन एक पद निर्माण करून ते का भरल ेजात नाही? असा जनतेचा सवाल आहे. नंडोरे-देवखोप ग्रामपंचायतीतील सुमारे १४ पाडे असून येथील आश्रमशाळा तसेच परिसरातील गाव-पाडे व पडघा येथील आश्रमशाळा याच उपकेंद्राच्या परिसरात आहेत. असे असताना येथे किमान २ पदे आरोग्यसेविकेची हवीत पण याउलट येथे एकच निवासी पद कार्यरत आहे. त्यातही फिरतीच्या कार्यक्र मामुळे अनियमतिता आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याविषयी विचारले असता त्यांनी याबाबतीत आश्वासने दिली पण ती सत्यात मात्र कधी उतरलेली नाहीत. जर महिन्याभरात हा प्रश्न सुटला नाही तर उग्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत येथील रहिवासी आहेत.
जिल्हा परिषदेच्या तडफदार मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यात लक्ष घालून रुग्णांना दिलासा देतील काय याकडे सगळ््या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Health subsection dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.