आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिने वेतन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:42 AM2018-05-13T06:42:37+5:302018-05-13T06:42:37+5:30
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया आठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे वर्ग तीन व वर्ग चारचे हजरो कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून पगारापासून वंचित राहिले आहेत
वसंत भोईर
वाडा : पालघर जिल्हा परिषदेंतर्गत येणाºया आठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे वर्ग तीन व वर्ग चारचे हजरो कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून पगारापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ऐन लग्न सराईत अनेकांवर उसनवारी करण्याची वेळ आली आहे.
आरोग्य कर्मचाºयांना लेखाशिर्षाखाली मासिक वेतन, वैद्यकीय बिले, प्रवास भत्ते, फरक बिले दरमहा मिळत असतात. मात्र गेल्या चार महिन्यांत वेतन व बिले न मिळाल्याने या कर्मचाºयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
गेल्या महिन्यात या कर्मचाºयांनी याच मागण्यांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दामोदर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड आदींनी मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत आरोग्य कर्मचाºयांचा वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही.