तारापूरमध्ये हृदयरोग, अस्थमा अन् त्वचारोग, वायू गळतीचा जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:31 AM2019-05-08T00:31:01+5:302019-05-08T00:31:29+5:30
तारापुर औद्योगिक क्षेत्रामध्ये वायुगळती व वायुप्रदूषणाचा जीव घेणा प्रवास सुरु असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वेळीच उपाययोजना न केल्यास एक दिवस तारापुर गॅस चेम्बर बनून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
- पंकज राऊत
बोईसर - तारापुर औद्योगिक क्षेत्रामध्ये वायुगळती व वायुप्रदूषणाचा जीव घेणा प्रवास सुरु असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची वेळीच उपाययोजना न केल्यास एक दिवस तारापुर गॅस चेम्बर बनून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेहमीच्या या वायुप्रदूषणामुळे हृदयरोग व अस्तमा याबरोबरच त्वचा आजारात मोठी वाढ झाली आहे.
आॅक्टोबर २०१८ या महिन्यात तारापूर एम.आय. डि. सी.मध्ये एका कारखान्याच्या बागायतीतील झाडाजवळ असंख्य चिमण्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. एका नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात वाहत जाणाऱ्या पिवळ्या रंगाच्या रासायनिक सांडपाण्यातून बाहेर पडलेल्या विषारी वायु व उग्रवासामुळे चिमण्या मृत्यू पावल्या होत्या. तर, त्या चिमण्यांना पाणी पाजून वाचिवण्याचा प्रयत्न करणा-या तेथील टपरीचालकाला ही त्या उग्र वास व वायुचा त्रास होऊन चक्कर आली होती.
जानेवारी २०१९ या महिन्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रातील ‘के’ झोन मधील बंद व जुन्या रासायनिक सांडपाण्याच्या पाईप लाईनमध्ये घातक रासायनिक सांडपाणी अनधिकृत पद्धतीने सोडल्याने त्या मधून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे त्या परिसरातील काम कारखान्यात काम करणा-या कामगारांना व रस्त्यावरून जाणा-या असंख्य नागरिकांना डोळ्याची जळजळ व श्वसनाचा त्रास इत्यादी प्रकारचे त्रास जाणवू लागल्याने कामगार काम बंद करून सुरिक्षत स्थळी पळाले होते.
रविवारी (दि. ५ मे) बजाज हेल्थ केयर या कारखान्यात वायुगळती होऊन कामगारांना डोळ्याला त्रास झाला होता त्यांच्यावर बोईसर मधील वेगवेगळ्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत तर अजून काही महिन्या पूर्वी दोन वेगळ्या कारखान्यात वायुगळतीमुळे कामगारांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. या सर्व घटना गंभीर असून धोक्याची घंटा आहे परंतु सर्व यंत्रणा लालफितीत बुरसटली असल्याने एक दिवस भोपाळ होण्याची शक्यता आहे.
वास्तविक, तारापूर येथील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एक कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे औद्योगिक क्षेत्रात रात्री दाट धूर पसरलेला असतो त्यामुळे काहीवेळा समोरचा रस्ता ही दिसत नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम अक्षरश: धाब्यावर बसवले जातात तर वायुगळती व वायु प्रदूषणामुळे कामगारांबरोबरच परिसरातील लाखो नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. याकडे लक्ष वेधले जात आहे.
प्रक्रिया न करता होते औद्योगिक उत्सर्जन : देशातील एकूण मृत्यू पैकी काही टक्के मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होतो हे अनेक अहवालातून समोर आले आहे. तर, तारापूर येथे कारखान्यातून हवेवर प्रक्रि या न करता औद्योगिक उत्सर्जन केले जाते. त्याच प्रमाणे प्लास्टिक व अन्य कचºयाच्या ढिगाऱ्यांना आग लावून तो कचरा नष्ट करण्यात येत असून त्यामधून वायु प्रदूषण होते तर तारापूर एमआयडीसीमध्ये प्रदूषणाचे मोजमाप यंत्रणा कुचकामी ठरली आहे.
स्क्र बर सिस्टीमक डे दुर्लक्ष : औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून सोडल्या जाणाºया विषारी वायूमुळे औद्योगिक क्षेत्रा बरोबरच परिसरातील गावांमध्ये वायुप्रदूषणाचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढला असून कारखान्यातून निघणाºया धुरामुळे वायू प्रदूषण होऊ नये म्हणून स्क्र बर सिस्टीम काटेकोरपणे चालविणे गरजेचे आहे परंतु ते खर्चिक असल्याने स्क्र बर बायपास करून प्रदूषित हवा सोडली जाते.