तहान भागवण्यासाठी गुरांचे कळप समुद्राकडे
By admin | Published: May 10, 2016 01:50 AM2016-05-10T01:50:05+5:302016-05-10T01:50:05+5:30
उन्हाच्या झळा तीव्र होऊन चारा-पाण्यासाठी गुरांची दमछाक होत आहे. गावातले जलसाठे कोरडे पडले असून, गुरे तहान भागविण्यासाठी समुद्रात आशेने जात
अनिरुद्ध पाटील, बोर्डी
उन्हाच्या झळा तीव्र होऊन चारा-पाण्यासाठी गुरांची दमछाक होत आहे. गावातले जलसाठे कोरडे पडले असून, गुरे तहान भागविण्यासाठी समुद्रात आशेने जात असून ते प्रदूषित, क्षारयुक्त पाणी पिण्या योग्य नसल्याने त्यांचीही निराशा होत आहे.
महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मे महिन्यातील एक-एक दिवस उलटत असताना डहाणू तालुक्यातील पाणी टंचाईही भीषण बनत चालली आहे. या वर्षी विहिरी तसेच कूपनालिकाच्या पाण्याने तळ गाठला आहे त्या पाण्यातील क्षारांचे प्रमाणही वाढले आहे.
माणसांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची परिस्थिती ओढवली असताना जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, झाई या गावातील तलावाचे पाणी आटले असून हिरवट व दुर्गंधीयुक्त पाणी पिणे गुरांनाही अशक्य झाले आहे. बहुसंख्य गावात राखीव गावराने व गुरचरण नाही. अस्तीत्वात असलेल्या गावातील क्षेत्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.