लोकमतच्या जलमित्र अभियानात हाय वेवरील हॉटेल्स सहभागी
By admin | Published: June 6, 2016 01:23 AM2016-06-06T01:23:13+5:302016-06-06T01:23:13+5:30
लोकमत जलमित्र अभियान अंतर्गत पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनजागृती मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल हॉटेल व्यवसायीकांनी या अभियानात रविवारी आपला
मनोर: लोकमत जलमित्र अभियान अंतर्गत पाणी वाचविण्यासाठी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जनजागृती मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल हॉटेल व्यवसायीकांनी या अभियानात रविवारी आपला सहभाग दर्शविला. यावेळी लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत ने लोकांमध्ये पाणी आपण कशा पध्दतीने वाचवू शकतो याची माहिती देण्यासाठी कुमार पार्क मस्तान नाका येथे लोकमत जलमित्र अभियान आयोजित केले होते. त्यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र.२ वरील हॉटेल व्यवसायीक सहभागी झाले होते त्यांच्याबरोबर वडापाव विक्री करणारे कॅन्टीन धारकही सहभागी झाले होते. यावेळी टेणी यांनी लोकमत जलमित्र अभियानाची संकल्पना उद्देश स्पष्ट करून पाणी पिण्यासाठी छोटे ग्लास, शॉवरचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन अंघोळ करणे तसेच गाडी धुण्यासाठी ड्राय क्लिनिंग तंत्राचा किंवा ब्रश वॉशिंग तंत्राचा वापर करणे, हॉटेलमध्ये टेबलावर पाण्याने भरलेला जग आणि ग्लास ठेऊन लागेल तेवढे पाणी ग्राहकांनाच घेऊ देणे, कोरडे खाद्यपदार्थ पेपरडिशमध्ये सर्व्ह करणे आदी उपाय अवलंबिण्याचे आवाहन केले.
हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष लतीफभाई यांनी आजपासुन आम्ही पाण्याचा कमी वापर व आपण दिलेल्या माहितीचा आम्ही सर्व हॉटेल व्यावसायीक विचारपूर्वक उपयोग करू आणि पाणी वाचवू असे सांगितले. हॉटेल शिमला इन, सुप्रिम, सहारा, डिसेंट, अॅप्पल, माउंट मस्तान सर्व हॉटेलधारक सहभागी झाले होते. यावेळी या अभियानाची पोस्टर्स सर्व हॉटेल्समध्ये लावण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच ती शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी लाऊन जनजागृती करण्याचेही निश्चित करण्यात आले.
(वार्ताहर)