कोरोनामुळे विक्रमगडकरांच्या मोगऱ्याचा सुगंध हिरमुसला; गिऱ्हाईक नसल्याने शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:52 AM2020-07-03T02:52:19+5:302020-07-03T02:52:28+5:30
अनेक गावांत होते लागवड, मात्र मजुरीपेक्षा दर कमी असल्याने फुले फेकून देण्याची वेळ
राहुल वाडेकर
विक्रमगड : विक्रमगड तालुका हा मोगरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. रोज अंदाजे १२-१३ टन मोगºयाच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने संचारबंदी लागू झाल्याने मोगºयाला गिºहाईक नाही आणि निर्यातही होत नाही. ऐन लग्नसराईचा सिझन निघून गेल्याने मोगरा उत्पादक शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि आता मोगºयाला भाव मिळत नसल्याने असलेला मोगरा फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
तालुक्यातील खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावात शेतकºयांनी मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मोगºयाचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्नातून प्रति किलो ३०० ते ५०० रुपये इतका दर मिळतो. मात्र कोरोना संसर्गामुळे गिºहाईकच नसल्याने मोगºयाचे भाव २० रुपये किलो झाले आहेत, तर मजुरांना कळ्या खुडण्यासाठी किलो मागे ४० रुपये द्यावे लागत असल्याने मजुरीपेक्षा मालाचा भाव कमी येत आहे. तर विकण्यासाठी पाठवलेल्या कळ्यांना गिºहाईक नसल्याने व्यापारी परत त्या कळ्या पुन्हा शेतकºयांकडे पाठवातात. त्यामुळे या कळ्या फेकून देण्याची वेळ शेतकºयावर आली आहे.
कोरोनामुळे तर ऐन लग्नसराईच्या मोसमातही मोगºयाला मागणी नव्हती आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर तर गिºहाईकच नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. मोगºयाच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयाची उलाढाल येथील शेतकरी करत असतात, परंतु यंदा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने आदिवासी शेतकºयांचे पार कंबरडे मोडले आहे.
श्रावण महिन्यात भाव वाढण्याची आशा, पण...
सध्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. परंतु, श्रावण महिन्यात मोगºयाच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे फुलांचे भाव पुढील काही काळात वाढतील, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, तोपर्यंत कोरोनाचे संकट संपावे, अशीही प्रार्थना शेतकरी करीत आहेत.
कोरोनाचा संसर्ग व पाऊस यामुळे मोगरा निर्यातीसाठी अडचणी येत आहेत. फुलांचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे माल जास्त परंतु मागणी कमी त्यामुळे भाव पडले आहेत. फुलांच्या विक्रीतून उत्पादकांचा भांडवली खर्च निघत नाही. - निलेश चौधरी, मोगरा उत्पादक शेतकरी
या वर्षी कोरोनामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराईचा ऐन सिझन निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. आता पाऊस सुरू झाल्याने गिºहाईक मिळत नसल्याने केवळ २० रुपये किलोने मोगºयाला भाव देत आहेत. तर, कळ्या काढण्यासाठी मजुरांना ४० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे मोगरा फेकूनसुद्धा द्यावा लागत आहे. -हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड
मोगºयाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. आगामी श्रावण महिन्यात व गणेशोत्सवात तरी बाजारभावात वाढ होईल, या आशेवर मोगºयाची जोपासना करीत आहोत. - प्रवीण कनोजा, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड