पूर्वजांचा इतिहास जपत नवी शिखरे गाठू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 02:54 AM2018-05-02T02:54:30+5:302018-05-02T02:54:30+5:30

महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरविरांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे.

The history of ancestors crossed the new peaks | पूर्वजांचा इतिहास जपत नवी शिखरे गाठू

पूर्वजांचा इतिहास जपत नवी शिखरे गाठू

Next

पालघर : महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरविरांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्र ांत करण्याचा निर्धार करु या असे प्रतिपादन पालक मंत्री विष्णू सवरा यांनी महाराष्ट्र दिनाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी पालक मंत्री विष्णू सवरा यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर पोलीस पथक, महिला पोलीस पथक, पोलीस बँडपथक, पालघर अग्निशामक पथक आदी पथकांनी पालकमंत्र्याना मानवंदना दिली.
याप्रंसगी पोलीस सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस उप अधिक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस निरीक्षक अशोक बापू होनमाने, सहायक पोलीस उपनिरीक्षक गवाराम दत्तात्रय कार्डीले, सहायक पोलीस उप. निरीक्षक राजेश सखाराम धुमाळ, पोलीस नाईक नरेंद्र मारु ती गायकवाड, पोलीस हवालदार विनय बाळकृष्ण मोरे आदींचा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सन्मानपत्रक देऊन गौरवण्यात आले. याप्रंसगी जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे आदि उपस्थित होते.कार्यक्र माचे सुत्रसंचालन शैलेश राऊत यांनी केले. या कार्यक्र मास वरिष्ठ शासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नागरिक आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जि.प. अध्यक्ष विजय खरपडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषदेत नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी धवजरोहण केले.

Web Title: The history of ancestors crossed the new peaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.