'मी विजबिल भरणार नाही, तुम्हीही भरू नका', हितेंद्र ठाकुरांचे वसईकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 11:13 PM2020-08-08T23:13:26+5:302020-08-08T23:13:55+5:30

चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

Hitendra Thakur appeals to Vasaikars, ..if dont paid light bill | 'मी विजबिल भरणार नाही, तुम्हीही भरू नका', हितेंद्र ठाकुरांचे वसईकरांना आवाहन

'मी विजबिल भरणार नाही, तुम्हीही भरू नका', हितेंद्र ठाकुरांचे वसईकरांना आवाहन

Next

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात विरारस्थित शाळा, कॉलेज बंद असताना देखील माझ्या  निवासस्थानासह अवास्तव आलेली साडेपाच लाखांची विजबिले मी अजिबात भरणार नाही, किंबहुना जी विजबिलं योग्य आहेत. ती त्यांनी जरूर भरावी. मात्र अवास्तव बिले तुम्हीही भरू नका, असे जाहीर आवाहनच आता वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसईतील जनतेला केले आहे. 
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारस्थित विवा कॉलेज, शाळा व घराचे विजबिल भरमसाठ आले असून त्यांना पाच बिलं मिळून  चक्क 5 लाख 50 हजारांचे विजबिल आले असल्याची माहिती स्वतः आम हितेंद्र ठाकूर यांनी शनिवारी विरार येथे लोकमतशी बोलताना दिली.

राज्यभरात विजबिलाच्या असंख्य तक्रारींचा महापूर सुरू असताना सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी कमालीची वाढली आहे. यात सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, व्यवसायिक असतील तर यात सेलिब्रिटीं देखील असून अशा अनेकांनी जाहीररित्या वाढीव व अवास्तव विजबिलाबाबत प्रंचड रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता हितेंद्र ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे. सर्वसामान्य नागरिक हैराण असून महावितरण नागरिकांना अवास्तव विजबिलं पाठवत असून अशी अवास्तव विजबिलं नागरिकांनी अजिबात भरू नये मी तुमच्या सोबत आहे. मात्र विजबिलं योग्य असतील तर जरूर भरा,असे आवाहन आता या निमित्ताने हितेंद्र ठाकूर यांनी वसईकरांना केले आहे

कोरोना संकटात आधीच जनता हैराण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरु नये. कंपनी, उद्योगधंदे बंद आहेत. नोकऱ्या नाहीत, कुठं पगार नाहीत तर बहुतांश वेतन कपात देखील सुरू आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असून विजबिले अवास्तव कशी येऊ शकतात तर मुंबईत अदानी व अंबानी यांच्या युनिटच्या दरापेक्षा आपल्या शासनाचे वीजदर अधिक आहेत तर लॉकडाऊन सरकारने केला त्याची चूक हकनाक नागरिकांना का?  तर यावर तोडगा काढा जनतेला दिलासा द्या, असे हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
 

Web Title: Hitendra Thakur appeals to Vasaikars, ..if dont paid light bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.