रसायनसदृश पिशव्यांचा ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 06:08 AM2018-10-05T06:08:27+5:302018-10-05T06:09:27+5:30
नमुने पृथक्करणासाठी पाठविले : अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमपीसीबी करणार कारवाई
बोईसर : टेम्पो ट्रक मधून बाहेर नेण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचरायुक्त गोणीला चिकटलेले रसायन सदृष्य व रंगीत पदार्थांनी माखलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे नमुने बोईसर पोलीस ठाण्याच्या आवारात उतरविण्यात आले आहे. हा ट्रक रिकामा करुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याचे नमुने परिक्षणासाठी संकलित केले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई बाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.
तारापूरच्या लुपिन लि. या औषध कारखान्यातील प्लास्टिकचा कचरा टेम्पो ट्रक मधून चालल्याची तक्र ार बुधवारी संध्याकाळी म. प्र. नि. मंडळाच्या ठाणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांना प्राप्त झाल्या नंतर ट्रक बोईसर पोलीस ठाण्यात आणून आतील भंगार युक्त प्लास्टीक व इतर सामानाची पाहणी करण्यात आली. या तपासणीत ३२०० किलो प्लास्टिक कचरा धारावी मुंबईला नेण्यात येत असल्याचे उघड झाले. त्या मधील बहुतांश प्लास्टिक गोणी, रासायन सदृष्य पदार्थांनी माखलेले आढळून आल्या तर बहुतांश प्लास्टिक गोणीत रबरी हॅण्डग्लोज भरलेले होते. त्याच बरोबर काही प्लास्टिकच्या गोणी मध्ये चिकटलेले नारंगी, पांढºयाव पिवळ्या रंगाची पदार्थाने माखलेल्या प्लास्टिक पिशव्यां होत्या त्या मधील नमुने संकलित करून ते तक्रारदार व पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमण उद्योगांचे प्रतिनिधी सर्जेराव पाटील यांच्या समक्ष साक्षांकित करून मोहर बंद केलेले आहेत या पाहणीच्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर - १ चे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर क्षेत्र अधिकारी नंदिकशोर पाटील उपस्थित होते.
लुपीन लि. या औषध तयार करणाºया कारखान्यातून कंन्टामेंटल वेस्ट बॅग, इंडस्ट्रीयल पॅकेझीन मटेरियल, हॅण्डग्लोज इत्यादी वस्तू ट्रक मध्ये भरून मुंबईतील धारावी येथे नेण्यात येत होत्या. तक्र ार प्राप्त होताच त्या ट्रकमधील सर्व वस्तू खाली उतरवून काही प्लास्टिक बॅगला चिकटलेल्या रसायन सदृष्य पावडर गोळा करून पृथक्करणासाठी पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल
- मधुकर लाड , प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे
या गाडी मधून जे काही प्लास्टिक बॅग, पुठ्याचे तुकडे, एम एस टिन इत्यादी मिक्स वेस्ट मान्यता प्राप्त व्हेंडर तर्फे पाठविले जात होते. ती गाडी संपूर्ण आमच्या समक्ष रिकामी केली असता तपासणी अंती असे निदर्शनास आले की, अशत: फक्त ठराविक भागाला कच्चा मालासारखे चिकटलेले पदार्थ आढळले. तसेच हे प्लास्टिक मान्यता प्राप्त व्हेंडरला पाठविले जात असून तो व्हेंडर (खरेदी करणारा) त्यांच्याकडे एमपीसीबी ची मान्यता (कंसेंट) आहे. त्यामुळे गाडी सोबत कागदपत्र आहेत.
- भुपेश घरत, डी.जी.एम. लुपिन लि.