होळी पेटवून सरकारविरोधात केला शिमगा

By admin | Published: March 11, 2017 02:15 AM2017-03-11T02:15:03+5:302017-03-11T02:15:03+5:30

जव्हार, मोखाडा आदी भागात रोहयो अंतर्गत पुरविण्यात आलेल्या कामाची तीन महिन्यापासून मजुरीच मिळाली नसल्याने स्थलांतर आणि कुपोषण रोखण्याचा बडेजाव

Holi is celebrated against the government | होळी पेटवून सरकारविरोधात केला शिमगा

होळी पेटवून सरकारविरोधात केला शिमगा

Next

- हितेन नाईक,  पालघर
जव्हार, मोखाडा आदी भागात रोहयो अंतर्गत पुरविण्यात आलेल्या कामाची तीन महिन्यापासून मजुरीच मिळाली नसल्याने स्थलांतर आणि कुपोषण रोखण्याचा बडेजाव मिरविणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या कारभाराचा आणि असंवेदनशील धोरणाचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पाच तहसीलदार कार्यालयावर आज "पोसद मोर्च्या"चे आयोजन करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी दिवसेंदिवस दारिद्र्याच्या अंधारात लोटला जात असून त्यांच्या उदरिनर्वाहा साठी एकमेव पर्याय म्हणून रोजगार हमी योजने कडे पिहले जाते.शासन,प्रशासना कडून रोहयो अंतर्गत कामे काढली जात असल्याचे सांगितले जात असले तरी अल्प दर आणि वेळेवर न मिळणारा पगार ह्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील लोक नाईलाजाने शहरी भागात स्थलांतर करून मिळेल ते काम स्विकारीत आहेत.ह्या आदिवासी बहुल भागात कुपोषण नसून रोजगार हमी योजनेची कामे हि प्रभावी पणे राबवली जात असल्याचा डांगोरा शासन पिटत असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक मजुरांना डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 ह्या कालावधीत केलेल्या कामाचे आजही पैसे मिळालेले नाहीत.एकी कडे काम देऊनही मजुरी मजुरी देत नाही,तर दुसरी कडे कामाची मागणी करूनही काम दिले जात नाही. एकट्या विक्र मगड तालुक्यात 755 मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
आदिवासी समाजात होळीचा सणाला खूप महत्व असते अश्या वेळी चार मिहन्याचा पगारचा झाला नसल्याने हजारो कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. म्हणून सरकारला सुबुद्धी मिळावी, आणि ह्या भागातील भ्रष्टाचार, गैरकारभार, गरिबांची भूक, सरकारची असंवेदनशिलता होळीत भस्म व्हाव्यात ह्या साठी पालघर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा व वाडा ह्या पाच तहसीलदार कार्यालया समोर होळी पेटवून आणि प्रतीकात्मक बाहुले बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. ह्यावेळी स्वत: संस्थापक विवेक पंडित, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने तहसीलदारांना दिले.

Web Title: Holi is celebrated against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.