गोखिवरे गावात गृह घोटाळा ; परवानगी घेतली इंडस्ट्रीची, बांधली रहिवासी वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 05:38 AM2019-12-06T05:38:33+5:302019-12-06T05:38:55+5:30

वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरात शांती होम रियालिटीने एक रहिवासी संकुल उभारले आहे.

Home scam in Gokhivare village; Permission is granted for the industry, built residential colony | गोखिवरे गावात गृह घोटाळा ; परवानगी घेतली इंडस्ट्रीची, बांधली रहिवासी वसाहत

गोखिवरे गावात गृह घोटाळा ; परवानगी घेतली इंडस्ट्रीची, बांधली रहिवासी वसाहत

Next

- मंगेश कराळे

नालासोपारा : वसई पूर्वेकडील गोखिवरे गावाजवळील फादरवाडी परिसरात औद्योगिक वापरासाठी आरक्षित जमिनीवर रहिवासी संकुल उभारुन सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ९ इमारती बांधून घोटाळा करणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांची फसवणूक करणाºया शांती होम्स रियल्टी या बांधकाम विकासकावर सहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महापालिकेने त्यांचे भोगवटा प्रमाणपत्रही रद्द केले आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग हा या इमारतींमधूनच जात असल्याने त्यांच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरात शांती होम रियालिटीने एक रहिवासी संकुल उभारले आहे. या निवासी संकुलात २०८ सदनिका आहेत. विशेष म्हणजे या इमारतीच्या येथूनच बुलेट ट्रेनचा मार्ग जातो, याची जाणीव असतानाही मनपाच्या नगररचना विभागाने या निवासी संकुलाला ओसी (आॅक्युपेन्सी सर्टिफिकेट) दिली होती. तर अनेक सदनिकाधारकांनी या घरासाठी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेले आहे. पण, आता हा प्रकल्पच बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने शेकडो सदनिकाधारक हवालदिल झाले आहेत. बिल्डरने केलेली फसवणूक आणि मनपा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे येथील २०८ सदनिकाधारकांवर टांगती तलवार आहे.
वसई पूर्वेतील गाव मौजे गोखिवरे, सर्व्हे क्र . २२६, २२७ हिस्सा क्र.२, ३, ४, ५ आणि सर्व्हे क्र. २२८ मध्ये शांती होम्स रिअलिटी एल.एल.पी. या बांधकाम व्यावसायिकाने ९ इमारतींच्या संकुलासाठी मनपाकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता. त्याला अनुसरुन मनपाच्या नगररचना विभागाने २०१६-२०१७ मध्ये वीवीसीएमसी/टीपी/आरडीपी/वीपी-५५४५/०५६/२०१६-२०१७ अशी बांधकाम परवानगी दिली होती. परंतु, हा प्रकल्प ज्या जागेवर उभारण्यात आला ती जागा औद्योगिक वापरासाठी आरक्षित आहे. त्याच बरोबर वसई- १ येथील महाराष्ट्र शासन नोंदणी आणि मुद्रांक विभागातून कागदपत्रे काढली असता त्यात या इमारतीतील युनिट (गाळे) हे सदनिका क्र मांक असे लिहून विकले गेले आहेत. हा सगळाच प्रकार गंभीर असतानाही नगररचना विभागातील अभियंत्यांनी बिल्डिंगला ओसी दिली. यासोबतच इमारतीला पालिकेने फायर सर्टिफिकेट, घरपट्ट्या आणि नळजोडण्याही दिल्या आहेत. मात्र, बिल्डरने केलेला फसवणुकीचा प्रकार पुढे अंगलट येऊ नये यासाठी नगररचना विभागाने प्रकल्पाला दिलेली ओसी रद्द केल्याचे समजते. जर मनपाने इमारतीची ओसी रद्द केली असेल तर आता या प्रकल्पाच्या वैधतेपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
तसे झाले तर या प्रकल्पात सदनिका घेणाºया २०८ कुटुंबाच्या भवितव्याचे काय? एकीकडे प्रकल्पाच्या वैधतेपुढे प्रश्न उभा ठाकला असताना दुसरीकडे आता या प्रकल्पातून बुलेट ट्रेनची मार्गिकादेखील जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची रचना फार वर्षांपासून सुरु होती. तथा या मार्गिकेचा नकाशा पालिकेकडे उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेने या निवासी संकुलला सीसी (बांधकाम परवानगी) व ओसी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

फसवणुकीला केवळ बिल्डरच जबाबदार नसतो तर त्याला सहाय्य करणाºया बँका, सदनिका नोंदणी करणारे दुय्यम निबंधक, सीसी-ओसी, घरपट्टी-पाणीपट्टी लावणारे पालिका अधिकारी-कर्मचारी तितकेच जबाबदार आहे. त्यांनी नोंदणी करून दिल्यामुळेच फ्लॅटधारक बिल्डरवर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांचीदेखील सखोल चौकशी झाली पाहिजे. पार्श्वभूमीवर बिल्डरवर ज्या प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्याचप्रमाणे मनपातील संबंधित अधिकाºयांवरदेखील फौजदारी कारवाई होणे क्र मप्राप्त असल्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. सोमवारी मुंबई हायकोर्टात पीआयएल दाखल करणार आहे. - प्रवीण भोईर, माजी नगरसेवक, मनसे

संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात ८ ते १० दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. नगररचना विभागाने पाठवलेल्या आदेशानुसार लवकर या इमारतींवर कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत चौधरी, सहाय्यक आयुक्त, वालीव विभाग, वसई विरार महानगरपालिका)

या प्रकरणाबाबत दोन ते तीन नगरसेवक आले होते त्यांनी दिलेल्या तक्रार अर्ज आणि त्यांनतर केलेल्या चौकशीवरून त्याची ओसी रद्द केली असून स्टॉप वर्कची नोटीसही देण्यात आली आहे. इंडस्ट्री बांधण्याची परवानगी घेऊन रहिवाशी संकुल विकासकाने बांधली आहे. कारवाई करण्यासाठी वालीव विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे.
- संजय जगताप (प्र.उपसंचालक,
नगररचना विभाग, वसई विरार महानगरपालिका)

Web Title: Home scam in Gokhivare village; Permission is granted for the industry, built residential colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.