शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:52 AM2017-09-02T01:52:45+5:302017-09-02T01:52:59+5:30

अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

 In the 'honor' crisis of farmers, ebb ebb | शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

शेतक-यांचा ‘सन्मान’ संकटात, कर्जमाफीला ग्रहण

Next

सुनिल घरत 
पारोळ : अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गत २२ दिवसातील ही महिती उसगाव येथील सुविधा केंद्रातुन लोकमतकडे उपलब्ध झाल्याने शेतकºयांसाठीच्या योजनेचा फज्जा उडाल्याचेच दिसत आहे.
या भागात शिरवली सेवा, सायवन सेवा, भाताणे सेवा, खानिवडे सेवा, कनेर सेवा, धानीव सेवा यासेवा सोसायटीचा ग्रामीण भागातील शेताकºयांना आधार असून खरीप व हंगामी पिकांसाठी त्या कर्ज पुरवठा करतात. परंतु, या वर्षी शासनाने कर्ज माफी केल्याने त्यासंदर्भातील अर्ज भरण्यासाठी या भागात सुविधा अपूºया आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अर्ज भरण्यासाठी १० मशीन उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश असतानाही चांदीप शाखेत मशीन नाहीत. यामुळे सेवा केंद्रावर अर्ज भरुन घेण्यासाठी या भागातील शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे.
कर्ज माफीचे अर्ज भरण्याची सेवा केंद्रावरील प्रक्रि या संथ असून अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना अनेक फेºया माराव्या लागत आहेत. यामुळे आमचा वेळ व पैसा वाया जात असून अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने ही प्रक्रि या जलद न झाल्यास शेतकºयांना कर्ज माफी पासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे मेढे येथील शेतकरी दिनकर पाटील यांनी लोकमतला दिली.

Web Title:  In the 'honor' crisis of farmers, ebb ebb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी