कुंदन तरे यांना पोलीस महासंचालक सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:51 AM2020-05-11T02:51:17+5:302020-05-11T02:51:36+5:30
उमरोळी येथील कुंदन यांनी वडिलांपासूनच प्रेरणा घेऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न शाळकरी वयात उराशी बाळगले होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आईने दिल्यानेच १९९४ मध्ये दलात भरती झाल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात.
बोर्डी : डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयातील अंमलदार कुंदन वासुदेव तरे यांना यंदाचा ‘पोलीस महासंचालक सन्मान’ देण्यात आला. त्यांनी या विभागात १५ वर्षे सेवा दिली असून अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल त्यांना बोधचिन्ह तसेच प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. या वर्षी सन्मानित झालेले पालघर जिल्हा पोलीस विभागातील ते एकमेव कर्मचारी आहेत.
उमरोळी येथील कुंदन यांनी वडिलांपासूनच प्रेरणा घेऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न शाळकरी वयात उराशी बाळगले होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन आईने दिल्यानेच १९९४ मध्ये दलात भरती झाल्याची कृतज्ञता ते व्यक्त करतात. दरम्यान, तपासाचे गुन्हे, त्याबद्दलची कागदपत्रे तयार करणे, प्रशासकीय कामकाज ही कामे आवडीने करत गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्त लावण्यासह मार्गदर्शन आणि कामाचे कौतुक केल्याने स्वत:वरील विश्वास वाढला. दरम्यान, अत्यंत क्लिष्ट आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करणाºया अधिकाऱ्यांना या पोलीस दलातील महत्त्वाच्या पदकाने दरवर्षीप्रमाणे सन्मानित करण्यात येते. राज्यातील गृहविभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे.