हॉटेल,बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत खुली पण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:54 PM2021-02-10T17:54:11+5:302021-02-10T17:54:21+5:30

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळांवरून गेल्या काही दिवसांपासून पोलिस व हॉटेल चालकांमध्ये सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी, अखेर वसई विरार महापालिकेने बुधवारी परिपत्रक जारी करत हॉटेल, दुकाने व मद्य अस्थपना  यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

Hotels, bars, restaurants, food courts open until 1pm but, rules for restricted area remain! | हॉटेल,बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत खुली पण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

हॉटेल,बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत खुली पण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

Next

सई :-
राज्य सरकारने आदेश जारी केल्यावर देखील वसईतील हॉटेल रेस्टॉरंट वेळेबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश काढले नव्हते तर त्यामुळे महापालिका हद्दीतील

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळांवरून गेल्या काही दिवसांपासून पोलिस व हॉटेल चालकांमध्ये सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी, अखेर वसई विरार महापालिकेने बुधवारी परिपत्रक जारी करत हॉटेल, दुकाने व मद्य अस्थपना  यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

 

यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सकाळी 7 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत, तर दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच मद्यविक्री अस्थपना याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10. 30 अशी केली आहे.

 

राज्य सरकारने 29 जानेवारी 2021 रोजी हॉटेल, बार, दुकाने व आस्थापनांच्या वेळा निश्चित केल्या होत्या.
तसे परिपत्रकही काढण्यात आले होते.
सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेऊन म
ध्यरात्
१वाजेपर्यंत हॉटेले सुरू ठेवण्यात येत होती. मुंबई महापालिकेच्या विभाग स्तरावरही मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र
तरीही रात्री1 वा जल्यानंतर सुरू असणाऱ्या हॉटेलांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोलिसांमध्ये खटके उडू लागले होते.

या वादावर पडदा टाकण्यासाठी, अखेर बुधवारी वसई विरार महापालिका अति
‌रिक्त आयुक्त संजय देहेरकर यांनी परिपत्रक काढून
काढून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, दुकाने यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. सरकाच्या परिपत्रकाचा आधार घेत आयुक्तांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, बँक्वेट हॉल, फूड कोर्ट यांच्या वेळा सकाळी ७ रात्री १ वाजेपर्यंत, तर दुकानांच्या वेळा सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत निश्चित केल्या आहेत. मद्य विक्रीची दुकाने मात्र सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र विभाग कार्यालयामार्फत घालून दिलेले नियम पाळावे लागतील. हॉटेल व्यवसाय अथवा दुकान चालू ठेवताना कोविडसंदर्भातील सुरक्षित अंतर, मास्क लावणे व अन्य नियम पाळणे बंधनकारक आहे. पालिकेने काढलेल्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Hotels, bars, restaurants, food courts open until 1pm but, rules for restricted area remain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.