नालासोपाऱ्याची थकीत घरपट्टी ८५ कोटीच्या घरात

By admin | Published: November 18, 2015 12:05 AM2015-11-18T00:05:15+5:302015-11-18T00:05:15+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नालासोपारा विभागीय कार्यालयाची घरपट्टीची थकबाकी ८५ कोटीच्या घरात पोहोचली आहे. घरपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी

In the house of Rs 85 crores in the house of a cavalcade owner | नालासोपाऱ्याची थकीत घरपट्टी ८५ कोटीच्या घरात

नालासोपाऱ्याची थकीत घरपट्टी ८५ कोटीच्या घरात

Next

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नालासोपारा विभागीय कार्यालयाची घरपट्टीची थकबाकी ८५ कोटीच्या घरात पोहोचली आहे. घरपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असून अनेक इमारतींना घरपट्टी लावण्यात आलेली नाही. गेली अनेक वर्षे थकबाकीचे प्रमाण जैसे थे स्थितीत आहे. अनेक इमारतींना घरपट्टीच्या नोटीसाही बजावण्यात आलेल्या नाहीत.
नालासोपारा नगरपरिषद असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली होती. महानगरपालिका निर्मितीनंतर यात बदल होईल अशी सर्वसाधारण करदात्यांची अपेक्षा होती. परंतु परिस्थिती आजही तशीच आहे. घरपट्टी वसुलीच्या थकबाकीबाबत वरिष्ठ अधिकारी गुरव यांच्याशी संपर्क साधला असता शहराच्या पूर्व भागात ७० कोटी तर पश्चिम भागात १५ कोटी अशी एकूण ८५ कोटीची थकबाकी असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)

दलालांचे लागेबांधे...
इमारतींना घरपट्टी लावण्याच्या प्रक्रियेमध्ये नगरसेवकांचाही सतत हस्तक्षेप होत असल्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत चालले आहे. इमारतींना घरपट्टी लावण्याकरीता अनेक दलाल पहावयास मिळतात. हे दलाल थेट राजकीय पक्षाशी संबंधीत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.

Web Title: In the house of Rs 85 crores in the house of a cavalcade owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.