लगीन घरी पाऊसाने उडवली वºहाडाची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:43 AM2017-12-06T00:43:37+5:302017-12-06T00:43:46+5:30

लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले

The house was filled with rains and it was very dangerous | लगीन घरी पाऊसाने उडवली वºहाडाची तारांबळ

लगीन घरी पाऊसाने उडवली वºहाडाची तारांबळ

Next

बोईसर : लवकरच सुरू होणारा पौष महिना त्यातच १२ डिसेंबर पर्यंतच असलेले लग्नाचे मुहूर्त त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांवर सोमवारी सायंकाळ पासून लागलेल्या पावसाने पाणी फिरवले. लगीन घरी अनपेक्षितरित्या दाखल झालेल्या वादळी पावसाने तारांबळ उडवली.
अवकाळी पावसाच्या या फटकेबाजीमुळे सिमला मिरची सह भाजीपाला उत्पादकही प्रचंड चिंतेत टाकले आहे. अरबी समुद्रातील ओखी चक्र ीवादळ किनारपट्टीला धडकण्या अगोदरच पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागा सह सर्वत्र सुरू झालेल्या मुसळधार वादळी पाऊसामूळे विवाह सोहळ्या करीता उभे करण्यात आलेल्या लग्न मंडपांना धोका पोहचला असून अनेक ठिकाणी वºहाडांची पळापळ झाली आहे. दल दल आणि चिखलमय जमिनीवर मंडप कसे उभारायचे त्याच बरोबरच पाहुणे मंडळींच्या कार पार्र्किंगचा मोठा प्रश्न लग्न असणाºया घरातील मंडळीना पडला आहे.
सोमवारी सायंकाळी तारापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभारे यांनी तारापूर येथील समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या मच्छिमारांनची बैठक घेऊन खबरदारी म्हणून कुणीही किनारपट्टी भागात जाऊ नये असे आवाहन केले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजे पर्यंत बोईसर सर्कल भागात १५.४ मि. मी. तर तारापूर सर्कल मध्ये १५.४ मी. मी. इतका पाऊस पडला असून मंगळवारी दिवसभर कधी मुसळधार तर कधी रिप रिप असा पाऊस सुरू होता.
यामुळे हवेत गारवा येऊन हूडहुडी भरत होती. पाऊसाचा सर्व घटकातील नागरिकांसह मंडप डेकोरेटर, गवत- पावली व्यापारी, शेतकरी, मच्छीमार, सिमला मिरचीचे व भाजीपाला उत्पादक, बोईसर मध्ये सुरू असलेली सर्कस इत्यादी सर्व व्यावसायिकांना जबर फटका बसून मानिसक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. तर हीच परिस्थिती पुढील काही दिवस राहणार असल्याची माहती हवामान खात्याकडून मिळत आहे.

पावसामध्ये कार्पेट, उच्च प्रतीचा कपडा, लायिटंग, सोफा व इतर साहित्य कमी जास्त फरकाने भिजल्याने प्रचंड नुकसान होणार आहे तर काही कामे रद्द झाली असून पुढील आॅर्डरच्या वेळी ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे.
- दिलीप शिर्के, मालक ,मंडप डेकोरेटर ,बोईसर

Web Title: The house was filled with rains and it was very dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.