क्र ीडा विकास साधणार कसा ?

By admin | Published: August 20, 2016 04:26 AM2016-08-20T04:26:16+5:302016-08-20T04:26:16+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची पदकतालिका बघून ‘गाव तेथे क्र ीडांगण’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक गावांमध्ये क्रीडांगणेच नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे?,

How to develop development? | क्र ीडा विकास साधणार कसा ?

क्र ीडा विकास साधणार कसा ?

Next

डहाणू/बोर्डी : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची पदकतालिका बघून ‘गाव तेथे क्र ीडांगण’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक गावांमध्ये क्रीडांगणेच नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तत्काळ हा मैदानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावलं उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, मैदानासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली आहे.
डहाणू तालुक्यातील अनेक गावे आणि शाळांना हक्काचे क्र ीडांगण नाही. यात किनाऱ्यालगतच्या गावांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. वास्तवकि सागर तटीय नियमन क्षेत्राच्या नियमावलीत खुली जागा, मोकळी मैदाने क्रीडांगणे यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बांधकामांना परवानगी आहे. परंतु येथे अनिधकृत बांधकामांचे पेव फुटले आणि मैदानांवरच टाच आली.
अनेक वर्षांपासून काही गावांमध्ये मोकळ्या जागांचा वापर स्थानिकांकडून खेळाचे मैदान म्हणून करण्यात येतो. पण, या जागा महसूल आणि वन विभागाच्या अखत्यारीत मोडतात. त्यामुळे कालांतराने या जागेवर विविध योजनांसाठी इमारतीचे बांधकाम केले जाते आणि आहेत ती मैदाने देखील नष्ट होताना दिसतात. चिखले गावातील सर्व्हे नं. २०२ व २०३ जागेतील विस्तीर्ण मैदान अशाच प्रकारे नष्ट झाले आहे. संबंधित गावातील ग्रा.पं. अथवा डहाणू महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. काही धनदांडग्यांनी शिक्षण संस्था निर्माण करून शाळा उघडल्या मात्र शाळांना मैदानेच नसल्याने विद्यार्थी खेळापासून वंचित आहेत. परिणामी मुलांना गल्लीबोळात, रस्त्याच्या कडेला, जिथे मिळेल तिथे खेळण्याची नामुष्की ओढवली आहे.

केंद्र सरकारने वन हक्क कायदा २००६ कलम ३ (२) नुसार वन जमीन सामूहिक वापरासाठी मान्यता दिली मात्र, त्या तेरा बाबींमध्ये क्र ीडांगणाचा समावेश केलेला नाही. तर अनेक ठिकाणी नागरिकांनीच गावठाण जमिनीवर अतिक्र मण केल्याने मैदाने नष्ट झाली आहेत.

चिखले गावात मैदानासाठी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. मात्र, ग्रामपंचायत ठोस भूमिका घेत नसल्याने क्रिडांगणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
- उमेश रघुनाथ चुरी (चिखले ग्रामस्थ)

जिल्ह्यात क्र ीडासंकुल व क्र ीडा कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. विद्यार्थ्यांना मैदाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासनाने क्र ीडा शिक्षकांच्या नेमणूकिला स्थिगती देऊन अतिथी शिक्षक नेमण्याची भूमिका खेळाच्या विकासाला मारक आहे.
- योगराज दत्तू शिरसाठ,
क्र ीडा केंद्रप्रमुख/
क्र ीडा शिक्षक डहाणू

स्वातंत्र्य दिनी चिखले ग्रामसभेत गावासाठी क्रि डांगणाची जागा आरिक्षत करणे आण िअतिक्र मण हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
- मनोज इंगळे, ग्रामविकास अधिकारी, चिखले ग्रामपंचायत

Web Title: How to develop development?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.