जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:07 AM2018-11-25T01:07:45+5:302018-11-25T01:08:02+5:30

कर्जाची रक्कम ३ कोटी २४ लाख : कर्ज माफ करा अन्यथा पालघर जिल्हयात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची शक्यता

How to pay the district bank's crop loan now? | जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

Next

- रविंद्र साळवे 


मोखाडा : पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळाचे संकट जव्हार मोखाड्यावर कोसळले आहे. दि ठाणे मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ३ कोटी २४ लाख ६६ हजाराचे पिक कर्ज कसे फेडायचे कसे असा प्रश्न एक हजार ४८१ शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.


अतिदुर्गम दरी खोºयात वसलेल्या मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे या ठिकाणी उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही पारंपरिक पद्धतीने बँकेकडून कर्ज घेऊन येथील आदिवासी शेती करत असतो .


वरई, नागली, तूर, उडीद, भात, खुरासणी आदि पिकांचे उत्पादन झाल्यावर यातील वरई उडीद व भात ह्याची विक्री करून बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाते परंतु या वर्षी शेतीतून पीक येण्या ऐवजी शेतकºयांच्या हाती पेंढाच आला आहे.


सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी उत्साहात विविध पिकांची लावणी केली. परंतु पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असतांना पावसाने ओढ दिल्याने शेतीवर झालेल्या विविध रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर कडक उन्हात शेती जागच्या जागीच करपून गेली यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी शेतकºयांनी शेताला आगी लावून दिल्या यामुळे दुष्काळाच्या खाईत बुडालेल्या शेतकºयांना बँकांकडून घेतलेली पीक कर्जे कशी काय फेडायची असा प्रश्न छळतो आहे. तो वेळीच सोडवला नाही तर शेतकºयाच्या आत्महत्यांचे सत्र पालघर जिल्हयातही मोठया प्रमाणात सुरू होण्याची दाट शक्यता शेतकºयांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली.


दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीच्या उत्पादनातून पिका ऐवजी पेंढाच हाती आला आहे यामुळे येथील गरीब शेतकरी पीक कर्ज कसे फेडणार यामुळे सरकारने प्रथमता मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करून पीक कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे
-सुनिल भुसारा,
( जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर)

Web Title: How to pay the district bank's crop loan now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.