चांगल्या रस्त्यांवर रोहयोचा निधी कसा खर्ची घातला?
By admin | Published: December 2, 2015 12:14 AM2015-12-02T00:14:25+5:302015-12-02T00:14:25+5:30
जव्हार, विक्रमगड, मोखाडा या आदिवासी बहुल दुर्गम भागातील बेरोजगारीमुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी कामे काढण्याच्या नावाखाली चांगल्या रस्त्यांवर रोहयोचा
विक्रमगड : जव्हार, विक्रमगड, मोखाडा या आदिवासी बहुल दुर्गम भागातील बेरोजगारीमुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी कामे काढण्याच्या नावाखाली चांगल्या रस्त्यांवर रोहयोचा निधी कसा खर्च केला गेला? असा सवाल श्रमजिवी संघटनेने केला आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांचे खडीकरण केले परंतु निर्धारित काळात त्याचे मजबुतीकरण न झाल्याने ही खडी उचकटून गेली व त्यावरील खर्च केलेला निधी वाया गेला याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.
या कागदोपत्री कामांमुळे कामे काढलेली व झालेली दिसतात परंतु त्यातून स्थानिक मजुरांना प्रत्यक्षात १०० दिवस सोडा एक दिवसही रोजगार मिळत नाही. कारण त्यावर दाखविल्या जाणाऱ्या निधीच्या खर्चाचा अपहार होतो. त्याची
चौकशी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे.
या भागात रोजगारावर मोठ्यावर प्रमाणात निधी दिला जातो. परंतु नियोजन व विकासकामातील पादर्शकता यांच्या अभावामुळे तालुक्यात रोजगारही निर्माण झाला नाही किंवा मजुरांचे स्थलांतरणही रोखले गेलेले नाही, असा दावा तिने केला आहे. (वार्ताहर)