पालकमंत्री अद्याप गप्प कसे? सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:17 AM2018-03-22T03:17:55+5:302018-03-22T03:17:55+5:30

जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारा पिंजाळ प्रकल्प रद्द करून दमणगंगा-पिंजाळ हा नवीन नदी जोड प्रकल्पा द्वारे इथले पाणी मुंबईला नेले जात असल्याने इथला स्थानिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

How to talk still Guardian Minister? Third day of fasting of Surya Water Sanitation Campaign Committee | पालकमंत्री अद्याप गप्प कसे? सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस

पालकमंत्री अद्याप गप्प कसे? सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीच्या उपोषणाचा तिसरा दिवस

Next

पालघर : जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणारा पिंजाळ प्रकल्प रद्द करून दमणगंगा-पिंजाळ हा नवीन नदी जोड प्रकल्पा द्वारे इथले पाणी मुंबईला नेले जात असल्याने इथला स्थानिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अश्यावेळी आमचे पालकमंत्र्यासह स्थानिक प्रतिनिधी मात्र नेहमी प्रमाणे गप्प बसले असले तरी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या उपोषणाच्या तिसºया दिवशी या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्र मगड तालुक्यातील शेतकरी व आदिवासी ह्यांच्या १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ व्हावा ह्यासाठी उभारलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी मुंबई, वसई आणि मिरा-भार्इंदर कडे वळविल्याने त्यांच्या जमिनी सिंचना विना ओसाड पडत आहेत. त्यामुळे इथले भूमीपुत्र एक बाजूला पाण्याच्या तर दुसºया बाजूला भूमीच्या अशा दुहेरी संकटात सापडला आहेत.
आज जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा येथे प्रत्येक वर्षी पाण्याची टंचाई भासत असताना त्यांची थट्टा करून इथलं उरल सुरल पाणीही पळविले जात आहे. आणि आमचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा मात्र ह्या विरोधात एक अवाच्चर शब्द ही काढायला तयार नसल्याने त्यांच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या बरोबरीने आमदार अमित घोडा, आ. विलास तरे, आ. पास्कल धनारे, विधान परिषदेचे आ.आनंद ठाकूर हेही पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नाबाबत आवाज उठवीत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकºयांच्या नावाने अश्रू ढाळणारे भाजप सरकार प्रत्यक्षात मात्र शेतकºयांचे सिंचन क्षेत्र कमी करून त्यांना कसे उध्वस्त करता येईल ह्या दृष्टीने आपल्या पाठीराख्या साठी तर काम करीत नाहीत ना? अशीही चर्चा इथे सुरू आहे.
हे उपोषण शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी असल्याने आणि भविष्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाण्याच्या दुर्भिक्षतेला सामोरे जावे लागणार असल्या ब्रायन लोबो ह्यांनी सांगितले.

हे तर निषेधार्ह
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्या सारख्या ज्वलंत प्रश्नाच्या हक्कासाठी हे उपोषणकर्ते आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. अशा वेळी आपले आदिवासी विकासमंत्री, काही लोकप्रतिनिधी, प्रशासन ह्यांना त्यांची साधी दखल घ्यावीशी वाटत नसल्याचा निषेध निलेश सांबरे यांनी केला आहे.
बुधवारी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, काळूराम धोदडे, हनुमान नगरचे प्रकल्पग्रस्त आदींनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शहा, आरपीआय , आदींनी लेखी पाठिंबा दिला.

Web Title: How to talk still Guardian Minister? Third day of fasting of Surya Water Sanitation Campaign Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.