टकमकगड मोहीमेत सापडले भरीव तोफगोळे
By admin | Published: July 5, 2017 06:02 AM2017-07-05T06:02:03+5:302017-07-05T06:02:03+5:30
वसई प्रांतातील प्रत्येक अवशेष बोलका आहे याची बुधवारी पुन्हा प्रचिती आली. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत टकमकगड टाके सफाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसई प्रांतातील प्रत्येक अवशेष बोलका आहे याची बुधवारी पुन्हा प्रचिती आली. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत टकमकगड टाके सफाई मोहिमेत गडावरील मुख्य पठारावरील पिण्याच्या पाण्याच्या प्राचीन टाक्यांत ३ तोफगोळे सापडल्याने इतिहासाच्या गर्भात गडप असलेल्या एका लढाईचे पुराभिलेखच सापडले आहेत.
आजच्या या संवर्धन मोहिमेत तब्बल ११ दुर्गमित्रांनी टाक्यातील माती, दगड व इतर मलबा ३ तास सातत्यपूर्ण काढून एक हजार लीटरच्या टाकीची सफाई पूर्ण केली. १२० हून अधिक घमेली गाळ मोकळा केल्याचे दुर्गिमत्र दुर्वेश पाटील व नितेश पाटील यांनी सांगितले. सन १८६० मध्ये या टाक्क्यांची ब्रिटिशांनी नासधूस केल्याची नोंद आहे.