वसईतील शेकडो बावखळे बुजवली तर असलेल्यांची झाली पार दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:07 PM2019-05-30T23:07:31+5:302019-05-30T23:07:44+5:30

वसई विरार महापालिकेचे हात वर : पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून मात्र पाठपुरावा सुरू

Hundreds of stupendous incidents in Vasai have been destroyed | वसईतील शेकडो बावखळे बुजवली तर असलेल्यांची झाली पार दुर्दशा

वसईतील शेकडो बावखळे बुजवली तर असलेल्यांची झाली पार दुर्दशा

Next

पारोळ : वसईत पूर्वजांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेकडो बावखळे खणली. एके काळी ही बावखळे वसईतील गारवा आणि हिरवळ जोपासण्याचे काम करीत होती. मात्र आज बहुसंख्य बावखळे कोरडी पडली आहेत. कचराकुंडीसारखा त्याचा उपयोग होत आहे. काही ठिकाणी तर बावखळ बुजवून घरे बांधण्यात आली आहेत. बावखलांच्या संवर्धनासाठी विनंती केली असता वसई विरार महापालिकेने हात वर केले असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ध्यास फाउंडेशन च्या खजिनदार आणि ग्रीन अंब्रेला आँर्गनायझेशनच्या सदस्य असलेल्या कुलकर्णी यांनी बावखलांच्या संवर्धनाचा प्रश्न समाज माध्यमातून उचलून धरला असता, त्यांना दोनच दिवसात शेकडो नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, ह्या विषयावर काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांच्याशी संपर्क साधला आहे. बावखळांची स्वच्छता व खोलीकरण हा जनसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे याचेच हे द्योतक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

वर्षागणिक पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच आहे. भूजल पातळी खाली जात आहे. अशा परिस्थितीत बावखळांचे पुनरु ज्जीवन करणे जरुरीचे आहे असा विचार करुन ध्यास फाउंडेशन मार्फत आम्ही वसई विरार महानगरपालिकेशी मदतीसाठी संपर्क साधला. सुरवातीला आचार संहितेमुळे आमचे हात बांधले आहेत. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. एप्रिल महिन्यात महापालिकेचे आयुक्त आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत वसईतील पूरसमस्येवर आयोजित कार्यक्रमात बावखळांबद्दल महानगरपालिकेला प्रश्न विचारण्यात आला होता. बावखळे खाजगी मालकीची असल्याने माहानगरपालिका काही करु शकत नाही असे उत्तर देऊन महापालिकेने या प्रकरणी हात वर केल्याचे त्या म्हणाल्या.

त्यांना बावखळे स्वच्छ करावयाची इच्छा आहे असे आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. बावखळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी संघटीत प्रयत्न होणे जरुरीचे आहे. महापालिकेने ग्रामस्थांना अशा कामासाठी प्रोत्साहन द्यावे.

त्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत द्यावी. शेततळ्यांसाठी शासकीय अनुदान मिळते. रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी महापालिका मदत करते. मग बावखळांच्या पुनरुज्जीवनासाठीही महापालिकेने मदत करायला हवी, अशी जाहीर मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. भूजलाच्या पुर्नभरणासाठी बावखळे जगली पाहिजेत, जमिनीत पाणी असेल तरच हिरवाई दिसेल, हरित वसई सुंदर वसई या

महापालिकेच्या धोरणाचाच हा एक भाग आहे. सर्व सुजाण नागरिकांनी, जाणत्या लोकनेत्यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे जरु रीचे आहे. बावखळे वाचवा, पाणी जिरवा ही वसईसाठी लोकचळवळ व्हावयास हवी, असेही त्यांनी आपल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे.

जनतेचा उत्साही प्रतिसाद
महाराष्ट्रात पाणी अडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार असे कार्यक्रम राबवले जात आहेत. वसईतील जाणत्या पूर्वजांनी निर्माण केलेली बावखळे कोरडी पडत आहेत. आणि वसईतील सुजाण नागरिक, जाणते लोकनेते, प्रगतिशील महापालिका हातावर हात ठेवून गप्प बसले आहेत, हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. अशा उद्वीग्न मनस्थितीत मी स्वत:च ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मुळगाव, किरवली, होळी, सांडोर येथील बावखळांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी चर्चा केली.

Web Title: Hundreds of stupendous incidents in Vasai have been destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.