तीन दिवस जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:11 PM2019-11-04T23:11:08+5:302019-11-04T23:11:29+5:30
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला
ठाणे/पालघर : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्र ीवादळ निर्माण झाले आहे. ते ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. त्यामुळे त्यापासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ठाणे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तयारीचा आढावा घेण्याचे आदेश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी ठाणे जिल्हा प्रशासनास जारी केले. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालीन यंत्रणांना सज्ज व सतर्क राहण्याचे आदेश दिले.
या कालावधीत मच्छीमारांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नये तसेच रजेवर असणाºयांनी हजर होण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्यासह महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, टीडीआरएफ, बांधकाम, आरोग्य अधिकारी आदी अधिकाºयांसह पोलीस अधिकारीदेखील या बैठकीला होते.
रहिवाशांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करा
यावेळी चक्र ीवादळामुळे अतिवृष्टीचा अंदाज असून खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाºयालगतच्या गावांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पत्र्यांची, कच्ची घरे, झोपड्यांमध्ये राहणाºया नागरिकांचे पक्क्या घरांमध्ये स्थलांतर करणे, शेतकºयांनी काढून ठेवलेली पिके आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.
तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये : चक्रीवादळाच्या संकटावर मात करण्यासाठी तीन दिवस मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या (एनडीआरएफ) पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, असे स्पष्ट केले.