सोन्याच्या बाली गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या; नालासोपाऱ्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 05:43 PM2022-11-20T17:43:36+5:302022-11-20T17:44:17+5:30

संतोष भवनच्या चौधरी कंपाऊंड येथील घटना

husband kills wife for not giving gold earrings as mortgage incident in nalasopara | सोन्याच्या बाली गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या; नालासोपाऱ्यातील घटना

सोन्याच्या बाली गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या; नालासोपाऱ्यातील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, 

नालासोपारा (मंगेश कराळे): आईच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध व्हावे म्हणून पत्नीकडे आरोपी पतीने कानातील सोन्याच्या बाली मागितल्या. तिने देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पेल्हार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. फरार आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पेल्हार पोलीस पुढील तपास करत आहे. 

संतोष भवनच्या चौधरी कंपाऊंड येथील समीरा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संजू सरोज (३५) या महिलेची हत्या शनिवारी झाली आहे. आरोपी पती राजेश विश्वकर्मा याच्या आईचे निधन झाले होते. तिच्या तेराव्याच्या कार्यासाठी लागणारे पैसे त्याच्याजवळ नव्हते. म्हणून त्याने पत्नीकडे तिच्या कानातील सोन्याच्या बाली मागितल्या. पण तिने देण्यास नकार दिला. हाच राग मनात धरून आरोपीने त्यांना मारहाण करून कशाने तरी गळा आवळून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह घरातच ठेवून दरवाजाला टाळा लावून आरोपी फरार झाला आहे. शेजारच्यांना रूममधून वास येत असल्याने आयुक्तालयाच्या ११२ हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून ही माहिती दिली. काही वेळातच पेल्हार पोलीस घटनास्थळी पोहचले आणि या घटनेचा उलगडा झाला. १४ वर्षाच्या मुलाने सावत्र बापाने आईची हत्या केल्याची रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोन्याच्या बालीवरून तीन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झाले होते. यापूर्वी त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यात आले होते. हे इतकेच दागिने असल्याने ते देण्यास आरोपी पतीला मयत पत्नीने नकार दिला होता. हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे. - महेंद्र शेलार (पोलीस निरीक्षक, गुन्हे, पेल्हार पोलीस ठाणे)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: husband kills wife for not giving gold earrings as mortgage incident in nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.